नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:45 AM2021-09-21T04:45:28+5:302021-09-21T04:45:28+5:30
स्नेहल सावंत यांना लिहिलेल्या पत्रात एक मुद्दा वेगळा आहे. त्यात काही पदांची यादी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत उद्धव ठाकरे ...
स्नेहल सावंत यांना लिहिलेल्या पत्रात एक मुद्दा वेगळा आहे. त्यात काही पदांची यादी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत उद्धव ठाकरे यांना दिली होती. ती अजून मंजूर झाली नाही व सामनात आली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे व आपण अत्यंत तातडीची काही पदे वर्षभरासाठी तात्पुरती दिली होती असे सरनाईक यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सरनाईकांनी दिलेली ती तात्पुरती पदेदेखील बेकायदेशीर नाहीत का, मुळात शिवसेनेत पद रद्द करण्याचा अधिकार संपर्कप्रमुखांना आहे का, असा सवाल काही शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.
सरनाईक यांच्या लेटरबॉम्बवर म्हात्रे व सावंत यांच्या नावाने शिवसेना जिल्हा शाखेचा संदेश व्हायरल झाला आहे. त्यात जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संघटक यांनी केलेल्या नियुक्त्या ग्राह्य असून पक्षवाढीसाठी तसे करण्याचा अधिकार आहे, असा एकनाथ शिंदे यांचा आदेश असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शिवसेनेमधील पद नियुक्त्यांच्या वादात शिंदे विरुद्ध सरनाईक सामना रंगण्याची शक्यता आहे.
...........
केवळ परस्पर झालेल्या नियुक्त्या रद्द : सरनाईक
प्रताप सरनाईक यांनी सामनात प्रसिद्ध झालेल्या, तसेच उद्धव ठाकरे, अनिल देसाई, एकनाथ शिंदे व संपर्कप्रमुख म्हणून मी यापैकी कोणाच्याही परवानगीशिवाय झालेल्या नियुक्त्याच रद्द ठरवल्या आहेत. त्यांच्या परवानगीने झालेल्या नियुक्त्या सोडून स्थानिक पातळीवर काही नियुक्त्या परस्पर झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. केवळ त्याच रद्द केल्या आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.