क्लस्टरच्या सीमांकनाचा वाद पुन्हा उफाळला, गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी केली नाराजी व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:39 PM2018-12-21T12:39:01+5:302018-12-21T12:40:43+5:30

क्लस्टरचे पाच ठिकाणांचे आराखडे मंजुर झाले असले तरी सीमांकनाचा वाद अद्यापही संपुष्टात आला नसल्याचे दिसत आहे. गावठाण आणि कोळीवाड्यातील रहिवाशांनी सीमांकन न करताच क्लस्टर योजना मंजुर केलीच कशी असा सवाल उपस्थित करीत या विरोधात आवाज उठविण्याचा पुन्हा निर्णय घेतला आहे.

Claims of cluster limit again, Gawatha expresses anger over the residents of Koliwada | क्लस्टरच्या सीमांकनाचा वाद पुन्हा उफाळला, गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी केली नाराजी व्यक्त

क्लस्टरच्या सीमांकनाचा वाद पुन्हा उफाळला, गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी केली नाराजी व्यक्त

Next
ठळक मुद्देसीमांकन निश्चित करण्याचा अधिकार पालिकेला नाहीपुन्हा रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

ठाणे - ठाणे शहरातील पाच ठिकाणांचा क्लस्टरचा आराखडा गुरुवारी झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला. या योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. परंतु असे असतांना आता क्लस्टरचा नवीन वाद आता निर्माण झाला आहे. महसूलमंत्र्याचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात क्लस्टर राबविण्याची पालिकेला घाई झाल्याचा आरोप गावठाण आणि कोळीवाड्यातील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळेच महसूल विभाग व भू मापन विभागाने करायचे सिमांकनाचे काम ठाणे महापालिका प्रशासनाने घाई घाईने क्लस्टर राबविण्यासाठी चालू केल्याची माहिती या स्थानिक भुमीपुत्रांनी दिली आहे.
                     कोळीवाडा व गावठाणांचे विस्तारित सिमांकन झाले नसताना श्रेय वादासाठी वैयिक्तक स्वार्थासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासन क्लस्टर चे सुधारित प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी मांडले होते. त्याला सभागृहाने एकमताने मंजुरीसुध्दा दिली आहे. परंतु हे कायद्याला धरुन नसल्याचा मुद्दा गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी केला आहे. ठाण्यातील भूमिपत्रांनी याबाबतचे सविस्तर असे निवेदन सोमवारी १७ डिसेंबरला महापौर मीनाक्षी शिंदे यांना दिले होते. त्यावर सविस्तर चर्चा सुद्धा केली होती. या प्रस्तावाला स्थगिती द्या अशी विनंती सुध्दा यावेळी करण्यात आली होती. परंतु असे असतांना गुरु वारी महासभेत क्लस्टरचा प्रस्ताव मंजूर कसा झाला असा प्रश्न ठाणे गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. कोपरी व राबोडी या परिसरात कोळीवाडे गावठाण येत असून त्याचे त्याचे महसूल विभागामार्फत व भू नगरमापन विभागाकडून विस्तारित सिमांकन झालेच नाही. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही ते लवकरात लवकर व्हावे ही कोळीवाडा व गावठाण यांची मागणी शासनाकडे आजही प्रलंबित आहे. हद्द निश्चित करण्याचे काम पालिकेचे नसून ते महसूल व भूमापन विभागाचे आहे. जर संबधित विभागाने कोळीवाडा व गावठाण यांचे विस्तारित सिमांकन केलेच नाही तर पालिकेच्या प्रशासनाने क्लस्टर चा सुधारित प्रस्ताव बनविलाच कसा? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या संदर्भात समितीचे सदस्य गिरीश साळगावकर यांनी सांगितले आहे की सीमांकन झाल्याशिवाय क्लस्टरच्या प्रकल्पाला मंजुरी देणे चुकीचे आहे. त्यामुळे याविरोधात शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.



 

Web Title: Claims of cluster limit again, Gawatha expresses anger over the residents of Koliwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.