उल्हासनगरातील कलानी महलमध्ये राडा; राष्ट्रवादी व रिपाइंचे कार्यकर्ते भिडले, शहरात तणावाचे वातावरण

By सदानंद नाईक | Published: November 25, 2022 03:22 PM2022-11-25T15:22:26+5:302022-11-25T15:23:12+5:30

उल्हासनगरातील एका व्हॉटअप ग्रुपवर गुरवारी रात्री रिपाइंचे शहराध्यक्ष भगवान भालेराव व राष्ट्रवादीचे प्रवक्ता कमलेश निकम यांच्यात वाद झाला.

clashes at Kalani Mahal in Ulhasnagar; Activists of NCP and Ripai clashed, atmosphere of tension in the city | उल्हासनगरातील कलानी महलमध्ये राडा; राष्ट्रवादी व रिपाइंचे कार्यकर्ते भिडले, शहरात तणावाचे वातावरण

उल्हासनगरातील कलानी महलमध्ये राडा; राष्ट्रवादी व रिपाइंचे कार्यकर्ते भिडले, शहरात तणावाचे वातावरण

googlenewsNext

उल्हासनगर : माजी आमदार पप्पु कलानी यांच्या कलानी महल मध्ये गुरवारी रात्री रिपाइं व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. याप्रकारने कलानी महल परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप येऊन शेकडो कार्यकर्ते उल्हासनगर पोलीस ठाणे परिसरात एकत्र आले होते. पोलिसांनी दोन्ही गटावर परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले.

उल्हासनगरातील एका व्हॉटअप ग्रुपवर गुरवारी रात्री रिपाइंचे शहराध्यक्ष भगवान भालेराव व राष्ट्रवादीचे प्रवक्ता कमलेश निकम यांच्यात वाद झाला. त्यानंतर भालेराव यांनी निकम याना व्हाट्सअप कॉल करून धमकी दिल्याचे, निकम यांचे म्हणणे आहे. त्यानंतर काही मिनिटात रिपाइंचे आकाश सोनावणे, योगेश पवार व शेट्टी आदी कार्यकर्ते कलानी महल मध्ये घुसुन कमलेश निकम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आकाश सोनावणेसह इतरांना मारहाण केली. तर आम्ही रस्त्यातून जात असतांना आम्हाला बोलावून कमलेश निकम यांच्यासह इतरांनी मारहाण केल्याचा आरोप सोनावणे यांनी केला आहे.

गेल्या महापालिका महापौर निवडणुकीत ओमी कलानी यांच्या समर्थक नगरसेवकांनी भाजपला अंगठा दाखवून रिपाईचे भगवान भालेराव व शिवसेना सोबत एकत्र आले होते. ओमी कलानी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच महापौर पदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान व उपमहापौर पदी भगवान भालेराव निवडून आले. दरम्यान भालेराव यांनी शिवसेना व ओमी कलानी यांची साथ सोडून भाजप गोटात दाखल झाले. तर ओमी कलानी समर्थकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर कलानी व भालेराव यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला. 

एका महिन्यांपूर्वी रस्त्याच्या श्रेयावरून कलानी व भालेराव आमने-सामने आले होते. दरम्यान गुरवारी कलानी महल मध्ये घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न रिपाइं कार्यकर्त्यांनी करून कलानीला आवाहन देण्याचा पर्यंत केला. यातून ऐन महापालिका निवडणुकी समोर राजकीय खुनी संघर्ष उभा ठाकण्याची भीती शहरात निर्माण झाली. उल्हासनगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ता कलमेश निकम व रिपाईचें आकाश सोनावणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परस्परा विरोधी गुन्हे दाखल केले. 

कलानी कुटुंबाविरोधात डावपेच 
महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना कलानी कुटुंब आपल्याकडे हवे आहे. काही महिन्यांपूर्वीच माजी आमदार पप्पु कलानी जेल बाहेर आले असून त्यांचे शहरात आकर्षण कायम आहे. त्यांना अटकाविण्याचा या माध्यमातून प्रयत्न असू शकतो. अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: clashes at Kalani Mahal in Ulhasnagar; Activists of NCP and Ripai clashed, atmosphere of tension in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.