भाईंदरच्या उत्तन येथे बस चालक आणि रिक्षा चालकात मारामारी
By धीरज परब | Published: June 2, 2024 08:43 PM2024-06-02T20:43:48+5:302024-06-02T20:44:06+5:30
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भागात बस आणि रिक्षा चालक यांच्यातील मारामारी प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात परस्पर एकमेकां विरुद्ध ...
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भागात बस आणि रिक्षा चालक यांच्यातील मारामारी प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात परस्पर एकमेकां विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालक इमरान निजाम खान ( वय ३३ वर्षे ) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार उत्तन वरून भाईंदर दिशेने बस चालवत असताना उत्तन वरचा नाका येथे रस्त्यात दोन रिक्षा उभ्या होत्या आणि दोन्ही रिक्षा चालक एकमेकांशी बोलत होते. हॉर्न वाजवून त्यांनी रिक्षा बाजूला घेतली नाही त्यामुळे बस थोडीशी पुढे घेतली असता रिक्षाच्या मडगार्डला लागले. त्याचा राग घेऊन रिक्षा चालकांनी खान यांना शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने त्याच्या कडील स्टीलच्या डब्याने डोक्यात मारले तर दुसऱ्याने गळ्यावर ठोशाने मारहाण केली. त्यावेळी जमलेल्या लोकांनी त्या रिक्षा चालकांना मारहाण करत खान याची सुटका केली . जखमी खान यांना भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले . इमरानच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १ जून रोजी दोन रिक्षावाल्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
तर दीपक ज्ञानोजी लहाने ( वय २९ वर्ष ) हे रिक्षा चालकयांच्या फिर्यादी नुसार , ते दुपारी रिक्षा मध्ये प्रवासी घेऊन भाईंदर बाजूकडे जात असताना वरचा नाका येथील व्यायाम शाळेसमोर रस्त्याचे काम चालू असल्याने समोरची गाडी अचानक थांबली . लहाने यांनी रिक्षा सुद्धा रस्त्याच्या बाजूला थांबवली असता मागून पालिकेच्या बसचालकाने मागून रिक्षाला बसचा धक्का दिला . लहाने हे विचारणा करण्यास गेले असता बसा चालकाने शिवीगाळ करत बस मधील लाकडी दांड्याने मारहाण केली . तेव्हा पंगा लिहलेला रिक्षावाला याने देखील लहाने यांना रॉड ने मारहाण केली . भांडण सोडविण्यास रिक्षातील प्रवासी गेले असता त्यांना सुद्धा ठोशाबुक्क्याने मारले . गर्दीतील ७ ते ८ जणांनी सुद्धा मारहाण केली . ३१ मे च्या रात्री उत्तन पोलसांनी बस चालक व पंगा रिक्षावाला , ७ ते ८ अन्य यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .