मे महिन्याच्या १५ तारेखपर्यंत नालेसफाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:38 AM2021-03-24T04:38:19+5:302021-03-24T04:38:19+5:30
ठाणे: राबोडी, के. व्हीला येथील नाला १२ मीटर पासून १८ मीटर करण्यात येणार आहे. यामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना अगोदर ...
ठाणे: राबोडी, के. व्हीला येथील नाला १२ मीटर पासून १८ मीटर करण्यात येणार आहे. यामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना अगोदर कल्पना करून त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करावी, त्याचबरोबर शहरातील नालेसफाई मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत करावी, अशा सूचना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी नालेसफाई पाहणी दौऱ्याच्या वेळी केल्या.
सोमवारी आमदार केळकर यांनी के व्हीला, राबोडी परिसरातील नाला पाहाणी दौरा महापालिका अधिकाऱ्यांसह केला. गेल्या काही महिन्यांत त्यांनी वृंदावन, बाळकूम येथील नालेसफाईची पाहणी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसह केली होती. त्यावेळीही आयुक्त डॉ. विपीन शर्मा याच्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा दर दोन महिन्यांनी नालेसफाईचा आढावा घेण्याची मागणी आयुक्तांकडे केली असता त्यांनीही ही बाब मान्य करून तशा सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या होत्या. मात्र, तसे झाले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.