नगरसेवकांना क्लीन चिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:21 AM2018-07-28T00:21:48+5:302018-07-28T00:22:09+5:30

उपमहापौरांचा जावईशोध; फेरीवाल्यांकडून हप्ते घेत नसल्याचा निर्वाळा

Clean chit to corporators | नगरसेवकांना क्लीन चिट

नगरसेवकांना क्लीन चिट

googlenewsNext

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत फेरीवाले उदंड झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापौर डिंपल मेहता यांनी नुकतीच सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक बोलवली होती. त्यात फेरीवाल्यांकडून काही लोकप्रतिनिधी रक्कम वसूल करत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता नगरसेवक फेरीवाल्यांकडून हप्ते घेत नसल्याचा निर्वाळा देत उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी त्यांना क्लीन चीट दिल्याने अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गल्लीबोळांत फेरीवाले आपले बस्तान मांडून वाहतूक व पादचाºयांची कोंडी करत असल्याचा मुद्दा अनेकदा उपस्थित होउन तक्रारीही करण्यात आल्या आहेत. अनेक महासभांतही त्यावर चर्चा झडल्या.
परंतु, तात्पुरत्या कारवाईखेरीज प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. तर काही नगरसेवक या कारवाईच्या अनुषंगाने अधिकाºयांवर आसूड ओढून आपली समाजाभिमुख कार्यतत्परता दाखवून देतात. मात्र बहुतांश नगरसेवक फेरीवाल्यांकडून सर्रास हप्ते गोळा करत असल्याचे फेरीवाला संघटनांच्या नेत्यांकडून सांगण्यात येते. हे हप्ते ते स्वत: गोळा न करता भ्रष्ट अधिकाºयांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेला वसूल करतात.
हप्ता मिळण्यास विलंब झाला की ते सतत त्या अधिकाºयांच्यामागे तगादा लावतात. त्यातच बाजार कर वसूल करणारे कंत्राटदार अधिक कर गोळा करण्याच्या हव्यासापायी फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ करून प्रशासनाचा नव्हे तर आपली झोळी भरतात. या व अशा अनेक गुंतागुंतीच्या फेºयात अडकलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाईचा आढावा घेण्यासह त्यावरील कारवाई व सूचना करण्यासाठी महापौरांनी बैठक बोलवली होती.
तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत सर्व नगरसेवकांना प्रभागाच्या क्रमवारीनुसार आपल्या तक्रारी, सूचना व म्हणणे मांडण्याची संधी दिली. यात हप्तेखोर नगरसेवकांचाही समावेश होता. त्यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास अधिकारीच टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला.
कारवाईनंतर साहित्य जप्त केल्यास हप्तेखोर नगरसेवक अधिकाºयांना फोन करून साहित्य परत देण्यास सांगतात, असे एका अधिकाºयाने सांगितले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नगरसेवकच पुरवतात भाड्याने गाड्या
भाजपाच्या नगरसेविका प्रभात पाटील यांनी तर फेरीवाल्यांना नगरसेवक व काही राजकीय मंडळींकडून भाडेतत्वावर हातगाडी पुरवली जात असल्याचा गौप्यस्फोट सभागृहात केला. या हातगाडींना विशिष्ट रंग देऊन त्याचे मासिक भाडे वसूल केले जाते. अशा हातगाड्यांवर कारवाई न करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले जातात. त्यामुळेच फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याची माहिती त्यांनी दिली.

पालिका आयुक्तांनी व्यक्त केली सामूहिक कारवाईची गरज
आयुक्त बालाजी खतगावकर यांनी फेरीवाल्यांवरील कारवाई केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता ती लोकप्रतिनिधींच्या सहभागाने सामूहिक होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेवकांनी केलेल्या सूचनेनूसार कारवाईचा आढावा घेऊन प्रसंगी फेरीवाला संघटनांचे म्हणणेही ऐकून घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Clean chit to corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.