स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे पुन्हा देशात १४ व्या स्थानी, तर राज्यात तिसरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 05:47 PM2021-11-20T17:47:02+5:302021-11-20T17:47:23+5:30

Thane News: भारत सरकारच्यावतीने २०२१ मध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात चौदाव्या क्र मांकवर तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे.

In clean survey, Thane again ranks 14th in the country and 3rd in the state. | स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे पुन्हा देशात १४ व्या स्थानी, तर राज्यात तिसरे

स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे पुन्हा देशात १४ व्या स्थानी, तर राज्यात तिसरे

Next

ठाणे - भारत सरकारच्यावतीने २०२१ मध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात चौदाव्या क्र मांकवर तर राज्यात तिसरा क्र मांक पटकवला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीचा क्र मांक राखण्यात शहराला यश आले आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पालिकेला या क्रमांकात जराही सुधारणा करता आलेली नाही. किंवा आपला क्रमांक वाढविण्यात फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्यावतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. २०२१ रोजी कच:याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रि या, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृध्दी आणि निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. ठाणे महापालिका हद्दीत सध्याच्या घडीला १ हजार मेट्रीक टन कचरा तयार होत आहे. त्याची वाहतुक महापालिकेकडून केली जात असली तरी महापालिकेला आजही कच:यावर शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावता आलेली नाही. किंबहुना तसे प्रकल्प देखील पालिकेला यशस्वी करता आलेली नाहीत. त्यातही आजही पालिकेला डम्पींगचा प्रश्न हा योग्य रिताने हाताळता आलेला नाही. आता कुठे दिवा येथील डम्पींग भांडर्ली येथे हालविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर या हालचाली झाल्याने त्या बाबत मात्र हा प्रकल्प कितपत यशस्वी होणार या बाबत मात्र साशंकता निर्माण झाली आहे. आज देखील पालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या पध्दतीने गोळा करण्यात येत असला तरी एकत्रित करुनच डम्पींगवर टाकला जात आहे. साफसफाईतही पालिकेला म्हणावे तितके यश आलेले नाही. त्यामुळेच मागील वर्षीच्या क्रमांकात कोणत्याही प्रकारे सुधारणा पालिकेला करता आली नसल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली.

दरम्यान या सर्वेक्षणामध्ये दोन वर्षापूर्वी क्रमांक हा ५७ वा होता. त्याच्याही आदल्या वर्षी हा क्रमांक ४० वा होता. मागील वर्षी या सुधारणा होऊन हा क्रमांक १४ व्या स्थानावर आल्याने आगाडी घेतल्याचे दिसून आले.  तर राज्यात ठाणे शहराने ३ रा क्रमांक पटकवला होता. यंदा देखील त्यात थोडाही बदल झालेला नाही. तरीसुध्दा या यशाबद्दल महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन टीमचे अभिनंदंन केले आहे.

Web Title: In clean survey, Thane again ranks 14th in the country and 3rd in the state.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.