नागरिकांना मिळणार स्वस्तात स्वच्छ पाणी

By admin | Published: August 14, 2016 03:19 AM2016-08-14T03:19:41+5:302016-08-14T03:19:41+5:30

शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सहजपणे आणि स्वस्तात स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ठाणे महानगरपालिका आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूर्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून

Clean water for citizens to get cheap | नागरिकांना मिळणार स्वस्तात स्वच्छ पाणी

नागरिकांना मिळणार स्वस्तात स्वच्छ पाणी

Next

ठाणे : शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सहजपणे आणि स्वस्तात स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ठाणे महानगरपालिका आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूर्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून किमान ५० ठिकाणी वॉटर व्हेंडिंग मशीन उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
शुक्रवारी सायंकाळी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूर्स कॉर्पोरेशनचे समूह महाप्रबंधक अरविंद मालखेडे, गृह विभागाचे विशेष कार्य अधिकारी मालेगावकर यांनी जयस्वाल यांची भेट घेऊन याबाबतचा प्रस्ताव सादर केला. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक रणखांब उपस्थित होते.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूर्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देशात विविध ठिकाणी स्वस्त दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची घोषणा नुकत्याच झालेल्या यासंदर्भात रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्येही करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर वॉटर व्हेंडिंग मशीन सर्वत्र उपलब्ध करून देण्याची कार्यवाही रेल्वेने सुरू केली आहे, जेणेकरून स्टेशनवर नागरिकांना स्वच्छ पाणी स्वस्त दरात उपलब्ध होईल.
या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमध्ये शहरातील गर्दीच्या एकूण ५० ठिकाणी अशी वॉटर व्हेंडिंग मशीन उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. यामध्ये सॅटीस, हॉस्पिटल, क्रीडा संकुले, नाट्यगृह आदी गर्दीच्या ठिकाणी ही मशीन बसवण्यात येणार आहेत. अतिशय अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या या मशीनमध्ये आॅनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम, थंड पाण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

या मशीनच्या माध्यमातून ३०० मिली पाणी (रिफील) १ रुपयात, तर कंटेनरसह २ रुपयांमध्ये मिळणार आहे. अर्धा लीटरची बाटली पाणी (रिफील) ३ रुपये, तर कंटेनरसह ५ रुपये, १ लीटरची बाटली (रिफील) ५ रुपये तर कंटेनरसह ८ रुपये, २ लीटरची बाटली (रिफील) ८ रुपये, तर कंटेनरसह १२ रुपये, ५ लीटर पाणी (रिफील) २० रुपये तर कंटेनरसह २५ रुपये या किमतीला पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: Clean water for citizens to get cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.