उल्हासनगरात गार्डनची आमदार आयलानी व कर्मचाऱ्यांकडून सफाई

By सदानंद नाईक | Published: October 13, 2022 05:15 PM2022-10-13T17:15:43+5:302022-10-13T17:15:43+5:30

Ulhasnagar News: कॅम्प नं-३ येथील सपना गार्डनच्या साफसफाई अभियानात आमदार कुमार आयलानी, भाजप अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह उपायुक्त अशोक नाईकवाडे, सफाई कामगार आदींनी सहभाग नोंदविला.

Cleaning of garden in Ulhasnagar by MLA Ailani and staff | उल्हासनगरात गार्डनची आमदार आयलानी व कर्मचाऱ्यांकडून सफाई

उल्हासनगरात गार्डनची आमदार आयलानी व कर्मचाऱ्यांकडून सफाई

Next

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील सपना गार्डनच्या साफसफाई अभियानात आमदार कुमार आयलानी, भाजप अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह उपायुक्त अशोक नाईकवाडे, सफाई कामगार आदींनी सहभाग नोंदविला. प्रत्येक प्रभाग समिती मधील एका गार्डनची सफाई आठवड्याला करण्यात येणार असून गुरवारी ४ गार्डनची सफाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिका उद्यानाची संख्या ६६ पेक्षा जास्त असून त्यांची दुरावस्था झाली. पावसाळा अंतिम टप्प्यात असून दिवाळीच्या सुट्टयात मुलांना खेळण्यासाठी मैदान व उद्यान उपलब्ध करून देण्यासाठी उद्यान सफाईची मोहीम महापालिका राबविणार आहे. त्यासाठी सफाई कामगारांच्या एका पथकाची स्थापना केली. कामगारांचे पथका सोबत स्थानिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक सहभागी होण्याचे आवाहन उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी केली. गुरवारी प्रत्येक प्रभाग समिती मधील एका उद्यानाची सफाई करण्यात आली आहे. 

कॅम्प नं-३ येथील सपना गार्डन साफसफाई अभियानात आमदार कुमार आयलानी, भाजप शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सपना गार्डन, गोलमैदान, नेताजी गार्डन, लालसाई गार्डन अश्या चार गार्डनची सफाई करण्यात आली असून पुढील आठवड्यात पुन्हा चार गार्डनची सफाई मारून त्यांची निघा राखून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली.

Web Title: Cleaning of garden in Ulhasnagar by MLA Ailani and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.