उल्हासनगरातील वालधुनी नदीची साफसफाई
By सदानंद नाईक | Updated: March 18, 2025 13:03 IST2025-03-18T13:03:33+5:302025-03-18T13:03:56+5:30
वालधुनी नदीची साफसफाई ऐन उन्हाळ्यात जेसीबी मशीनद्वारे केली जात असून नदी पात्रातून काढलेली गाळ व कचरा उचलण्यात येत आहे.

उल्हासनगरातील वालधुनी नदीची साफसफाई
उल्हासनगर : महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वालधुनी नदीसह लहान मोठ्या नाल्याची सफाई जेसीबी मशीन लावून केला जातो. यावर्षी मात्र वालधुनी नदीची साफसफाई ऐन उन्हाळ्यात जेसीबी मशीनद्वारे केली जात असून नदी पात्रातून काढलेली गाळ व कचरा उचलण्यात येत आहे.
शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी शहराला वरदान नं ठरता शाप ठरत असल्याचे बोलले जात आहे. नदी पात्रात गाळ, प्लास्टिक कचऱ्याने तुंबल्याने, नदीच्या दुर्घधीचा त्रास किनाऱ्यावरील नागरिकांना होऊ लागला. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नदीच्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये. यासाठी नदीच्या साफसफाईचा निर्णय पावसाळ्यापूर्वी घेतला. उल्हासनगर रेल्वे स्टेशन, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, वडोलगाव आदी परिसरात नदीची सफाई जेसीबी मशीनद्वारे केली जात आहे. नदीची साफसफाई झाल्यामुळे नदीच्या प्रदूषणात व दुर्घधी पसरणार नाही.
महापालिका जेसीबी मशीनद्वारे नदीतील कचरा आणि गाळ काढत असून शहरातील सांडपाणी नदीत मिसळू नये, यासाठी मलनिसारण केंद्र उभारण्यात आले. नागरिकांनी नदी पात्रात कचरा व प्लास्टिक पिशव्या टाकू नये. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे व आरोग्य विभागाचे प्रमुख विनोद केणी यांनी दिली आहे.