मीरा-भाईंदरमध्ये रंगली स्वच्छतेची स्पर्धा; अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव झाले सहभागी

By धीरज परब | Published: September 17, 2022 08:20 PM2022-09-17T20:20:34+5:302022-09-17T20:21:04+5:30

इंडियन स्वच्छता लीगच्या अनुषंगाने मीरा भाईंदर मध्ये आज समुद्र किनारे , किल्ले , खाडी किनारे स्वच्छ करण्यासह जनजागृतीपर प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते .

cleanliness competition in mira bhayandar actress mugdha godse and actor rahul dev participated | मीरा-भाईंदरमध्ये रंगली स्वच्छतेची स्पर्धा; अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव झाले सहभागी

मीरा-भाईंदरमध्ये रंगली स्वच्छतेची स्पर्धा; अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव झाले सहभागी

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - इंडियन स्वच्छता लीगच्या अनुषंगाने मीरा भाईंदर मध्ये आज समुद्र किनारे , किल्ले , खाडी किनारे स्वच्छ करण्यासह जनजागृतीपर प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते . पावसाची तमा न बाळगता मोहिमेत विद्यार्थी व तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती . महापालिकेच्या ब्रँड अँबेसेडर अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव यांनी सुद्धा स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला . 

केंद्र शासन व राज्य शासनाच्या निर्देशा नुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान "इंडियन स्वच्छता लीग" अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेचा स्वच्छाग्रही संघ सहभागी झाला आहे . आज शनिवारी पाऊस असून देखील शहरातील शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी , तरुण , विविध संस्थांचे कार्यकर्ते , नागरिकां मध्ये स्वच्छतेचा मोठा उत्साह होता . 

भाईंदरच्या उत्तन व वेलंकनी चौपाटी येथे स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने विद्यार्थी व  तरुण वर्ग सहभागी झाला होता . पालिकेच्या स्वच्छता संघाचे ब्रँड अँबेसेडर अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव सह आमदार गीता जैन , आयुक्त दिलीप ढोले , स्टार प्रचारक हर्षद ढगे , अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर, उपायुक्त  रवी पवार , मारुती गायकवाड व संजय शिंदे, शहर अभियंता दिपक खांबित, कांदळवन विभागाचे वनपाल सचिन मोरे सह अधिकारी , माजी नगरसेवक , कर्मचारी आदींनी साफसफाई केली . 

पाली जेट्टी - किनारा येथे मच्छिमार नेते बर्नड डिमेलो , परवाना अधिकारी नंदकुमार पाटील, मच्छिमार संस्थेच्या अध्यक्षा फेमिना डिमेलो सह स्थानिक मच्छीमार व महिला यांनी साफसफाई केली . जेसलपार्क खाडी किनारा , चौक येथील धारावी किल्ला व घोडबंदर किल्ल्यात स्वच्छता करण्यात आली . 

सकाळी भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान पासून भाईंदर रेल्वे स्थानक तर भाईंदर पूर्व , कनकिया, मीरारोड , काशीमीरा अश्या विविध ठिकाणा वरून  पालिकेचे अधिकारी, शाळकरी विद्यार्थी ,  सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक व नागरिकांनी जनजागृतीपर स्वच्छता फेऱ्या काढल्या होत्या . यावेळी प्लास्टिक बंदी , ओला व सुका कचरा वेगळा करणे , कचरा सार्वजनिक ठिकाणी न फेकणे , उघड्यावर लघुशंका व शौच न करणे आदी आवाहन रॅली द्वारे करण्यात आले . 

प्रभाग निहाय स्वच्छता मोहिमे नंतर सहभागी विद्यार्थी व नागरिकांना रामदेव पार्क येथील पालिका विपश्यना केंद्र येथे अभिनेत्री मुग्धा व अभेनेते राहुल , आ. जैन , आयुक्त ढोले आदींच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले . महापालिकेने व कांदळवन विभागाने स्वच्छता मोहिमेत सहभागी विद्यार्थी व नागरिकांना अल्पोपहार , ग्लोव्ज , पाणी आदीं उपलब्ध करून दिले . 

Web Title: cleanliness competition in mira bhayandar actress mugdha godse and actor rahul dev participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.