युवकांनी केली माहुली किल्ल्यावर स्वच्छता
By admin | Published: May 24, 2017 01:04 AM2017-05-24T01:04:47+5:302017-05-24T01:04:47+5:30
ठाण्यासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या युवकांनी किल्ल्यावर पायी आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या युवकांनी किल्ल्यावर पायी आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार करत जात हातात झाडू घेऊन माहुली किल्ला स्वच्छ केला. सह्याद्री प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान
आणि ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही माहुली किल्ला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
आसनगाव स्थानकापासून काही अंतरावर आणि सुमारे २८१५ फूट उंचीवर असलेल्या या माहुली किल्ला स्वच्छता मोहिमेत राज्यातील विविध ठिकाणांहून आलेले युवक सहभागी झाले होते. तरुणांबरोबरच तरुणीही या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोहिमेत सहभागी युवकांनी किल्ल्याचा महादरवाजा येथील परिसर स्वच्छ केला.
किल्ल्यावर पाण्याचे जे कुंड होते, तेही सर्व स्वच्छ करून इतरत्र पडलेल्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचा कचरा स्वच्छ केला. त्यानंतर, जय जय महाराष्ट्र माझा, हे गीत सर्वांनी एकत्रितपणे सादर करून स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली. या मोहिमेमध्ये ठाणे जिल्हा युवा क्र ीडा प्रतिष्ठानचे अमित मोकाशी, रोशन कदम, स्वप्नील लेंडे, योगेश बोरसे, मोनाली मोरे, मानसी मोरे, मनीष मोरे, तेजस पवार, सुधाकर पतंगराव, सुनीत सकपाळ, ऋ षिकेश चव्हाण, निखिल मोकाशी, स्वप्नील पाटील, तेजस पवार हे युवक सहभागी झाले होते.