पहिल्याच पावसात सफाईची पोलखोल

By admin | Published: June 26, 2017 01:26 AM2017-06-26T01:26:04+5:302017-06-26T01:26:04+5:30

शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत राहिल्याने शहरांतील सखल भागासह इतर परिसरातही पाणी तुंबल्याचे चित्र प्रामुख्याने रविवारी

Cleanliness Polar in the first rain | पहिल्याच पावसात सफाईची पोलखोल

पहिल्याच पावसात सफाईची पोलखोल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण / डोंबिवली : शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत राहिल्याने शहरांतील सखल भागासह इतर परिसरातही पाणी तुंबल्याचे चित्र प्रामुख्याने रविवारी सकाळी पाहयला मिळाले. विजांचा लखलखाट, ढगांच्या गडगटासह कोसळलेला या पावसात झाडे उन्मळण्याच्या घटना ठिकठिकाणी घडल्या. या पावसाचे पाणी नागरिकांच्या घराघरांमध्ये घुसल्याने पहिल्याच पावसात मोठ्या नाल्यांच्या सफाईसह छोटया मोठ्या गटारींच्या सफाईच्या कामांची पोलखोल समोर आली. गेल्या २४ तासात कल्याणमध्ये १५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
कल्याण पूर्वेतील पिसवली, आशेळे पाडा येथे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. याठिकाणचा तिसगाव नाला भरून वाहायला लागल्याने दामोदरनगर, नंदादीपनगर, यादवचाळ परिसरातील भागांमध्ये पाणी साचले होते. चेतना शाळेच्या पुढे बुद्ध विहाराजवळ, विष्णूधाम, एकविरा, राधाकृष्ण पार्क समोरील नागरिकांच्या घरांमध्ये २ ते ३ फूट पाणी तुंबले होते. शंभर फुटी रस्त्याचा परिसरही पाण्याखाली गेल्याने रस्त्याच्या बाजूला उभी केलेली वाहनेही पाण्यात बुडाली होती.
कल्याण खाडीच्या पातळीत वाढ झाल्याने डोंबिवलीतील महाराष्ट्रनगर, गरिबाचा वाडा, तर कल्याणमधील गोविंदवाडी, दुर्गाडी परिसरात पाणी भरले होते. मोठ्या प्रमाणावर झाडे पडली. कल्याणमध्ये सायंकाळपर्यंत तब्बल २५ ते ३० झाडे उन्मळून पडली तर डोंबिवलीत १० ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. डोंबिवलीतील गोग्रासवाडी पाटीलचाळ, रामनगरमधील सुखी जीवन सोसायटी, टिळकनगर, गोपाळनगर, तुकारामनगर, केळकर रोड, कोपर रोड, भोपर, जुनी डोंबिवली, महात्मा फुले रोड यासह कल्याण-शीळ रोड, निवासी विभाग, नांदिवली येथे पाणी तुंबले होते. डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोड परिसरात झाड कोसळण्याच्या स्थितीत आल्याने हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता.

दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
शनिवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कचरा, माती, गाळ वाहून आला आहे. तो साफ करण्यासाठी काहीवेळ पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याने पुढील दोन कल्याण, डोंबिवलीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली.

Web Title: Cleanliness Polar in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.