झीरो पेंडन्सीच्या नावे अभिलेखांच्या सुरक्षेसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची जोरदार साफसफाई !
By सुरेश लोखंडे | Published: October 12, 2018 07:06 PM2018-10-12T19:06:09+5:302018-10-12T19:18:14+5:30
राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणातील सर्व विभागांमध्ये झीरो पेंडन्सीचे काम हाती घेतले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानूवर्ष धूळखात पडून असलेले प्रस्तावांवर त्वरीत निर्णय घेऊन ते निकाली काढले जात आहे. याशिवाय कपाटे, रॅक्स आणि भिंतीच्या कप्यांमध्ये ठेवलेले जुने दस्तऐवजांमधील कागदपत्रांची देखील आता छाननी सुरू आहे. या कामात दिरंगाई व वेळ काढूपणा नको म्हणून सुटीच्या कालावधीत देखील अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित
ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांमध्ये असलेल्या अभिलेखांचे कागदपत्रांची छाननी, त्यातील महत्वाचे कागदपत्रांचा सांभाळ करण्याचे नियोजन आणि रोज आलेल्या टपालावर त्याच दिवशी योग्य ती कारवाई करून ते निकाली काढणे आदीं कामे झीरो पेंडन्सीच्या नावाखाली जोरदार सुरू आहे. यामुळे साफसफाईचे काम खातेप्रमुखाच्या नियंत्रणात कर्मचाऱ्यांकडून युध्दपातळीवर सुरू आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणातील सर्व विभागांमध्ये झीरो पेंडन्सीचे काम हाती घेतले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानूवर्ष धूळखात पडून असलेले प्रस्तावांवर त्वरीत निर्णय घेऊन ते निकाली काढले जात आहे. याशिवाय कपाटे, रॅक्स आणि भिंतीच्या कप्यांमध्ये ठेवलेले जुने दस्तऐवजांमधील कागदपत्रांची देखील आता छाननी सुरू आहे. या कामात दिरंगाई व वेळ काढूपणा नको म्हणून सुटीच्या कालावधीत देखील अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून झीरो पेंडन्सीचे काम युध्द पातळीवर करीत आहेत. यामुळे कार्यालयांची साफसफाई होऊन वर्षानुवर्षची धूळ व जळपटे काढण्याचे काम सुरू आहे.
या साफसफाईच्या कामांसह रोजचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देखील संबंधीत कार्मचाऱ्यांवर देण्यात आली. या झीरो पेंडन्सी मोहिमेचे दोन टप्पे निश्चित केले आहेत. यातील पहिल्या टप्यामध्ये कार्यालयातील सर्व प्रकारचे अभिलेखांचे वर्गीकरण करायचे आहे. यामध्ये कागदपत्रांची छाननी करून त्यांचे ‘अबकड’मध्ये वर्गीकरण करायचे आहेत. यातील ‘अ’मधील वर्गीकरणात कायमस्वरूपी कागदपत्रांचा समावेश आहे. या सर्व कागदपत्रांचा गठ्ठा लाल रंगाच्या कापडात बाधून तो कायम स्वरूपी असल्याचे नमुद केले जात आहे. याशिवाय ‘ब’मध्ये ३० वर्षांपर्यंतची जुन्या कागदपत्रांचा समावेश आहे. या सर्व कागदपत्रांचा गठ्ठा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून त्यावर ‘ब’ असे वर्गीकरण नमुद केले जात आहे. या ‘अ’ आणि ‘ब’ या दोन वर्गीकरणाच्या गठ्यांना अभिलेख कक्षाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून सुरक्षित ठेवले जात आहेत.
या वर्गीकरणाप्रमाणेच ‘क’मध्ये दहा वर्षांपर्यंतचे कागदपत्रांचा सांभाळ करण्यात येत आहे. या कागदपत्रांचे गठ्ठे हिरव्या रंगाच्या कापडामध्ये बांधले जात आहेत. तर एक ते पाच वर्षांपर्यंतच्या कागदपत्रांचे ‘ड’मध्ये वर्गीकरण होत आहे. या कागदपत्रांचे गठ्ठे पांढऱ्यां कापडामध्ये बांधले जात आहेत. या ‘क’ आणि ‘ड’ वर्गीकरणाचे गठ्ठे कार्यालयातच जबाबदारीने कपाटात, रॅक्सवर किंवा भिंतींच्या कप्यांमध्ये ठेवले जात आहेत. या वर्गीकरणानंतरच्या झीरो पेंडन्सीमध्ये रोजच्या रोज आलेल्या कागदपत्रांवर त्वरीत संबंधीतांनी निर्णय घेऊन ते निकाली काढण्याचा टप्पा आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज जलद होत असून जुन्या दस्तऐवजांसह अभिलेखांची नोंद घेऊन त्यांची सुस्थितीत सुरक्षा केली जात आहे.