आण्णा नगरमध्ये स्वच्छतेची, वाहतूककोंडीची समस्या

By admin | Published: August 30, 2015 11:28 PM2015-08-30T23:28:46+5:302015-08-30T23:28:46+5:30

येथील जुन्या डोंबिवली परिसरात असलेल्या दिवा-वसई रेल्वे लाइन लगतच्या आण्णा नगरमध्ये अवघे एक स्वच्छतागृह असून सुमारे २०० कुटुंबियांच्या वस्तीसाठी ते अपुरे आहे

Cleanliness, traffic problems in Anna Nagar | आण्णा नगरमध्ये स्वच्छतेची, वाहतूककोंडीची समस्या

आण्णा नगरमध्ये स्वच्छतेची, वाहतूककोंडीची समस्या

Next

अनिकेत घमंडी, डोंबिवली
येथील जुन्या डोंबिवली परिसरात असलेल्या दिवा-वसई रेल्वे लाइन लगतच्या आण्णा नगरमध्ये अवघे एक स्वच्छतागृह असून सुमारे २०० कुटुंबियांच्या वस्तीसाठी ते अपुरे आहे. येथे एक स्वच्छतागृह बांधले होते, परंतु ते उत्साहाच्या भरात भूखंडाच्या मालकीची खातरजमा न करता रेल्वेच्या जागेत बांधण्यात आल्याने ते शुभारंभापूर्वीच तोडण्यात आले, त्यामुळे तेथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. याच ठिकाणी युटीडब्ल्यूटी (अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग) या अत्याधुनिक पद्धतीने रस्ता बांधण्यात येत असून त्याचे काम रात्री करण्यात येते आहे.
चिंचोळा व नागमोडी रस्ता असल्याने दिवसा काम करणे शक्य नसल्याने फक्त रात्रीच ते करण्यात येत आहे. सध्याचा रस्ता हा चिखल, खड्डेमय असल्याने नागरिक त्रस्त आहेत. आधीच रस्ता लहान असल्याने एकाच वेळी दोन विरुद्ध दिशेने चारचाकी, अथवा मोठ्या गाड्या जातांना वाहतुकीची समस्या उद्भवते अशी स्थिती आहे. त्यात आता रस्त निर्मितीच्या कामाची भर पडली आहे. काही प्रमाणात स्लम, आणि इमारतींचा असा संमिश्र असा हा परिसर असून त्यात सर्वधर्मिय नागरिक वास्तव्यास आहेत. बहुतांशी नागरिक हे नोकरीनिमित्त मुंबईसह अन्यत्र जातात. त्यामुळे पाणी, रस्ते, वीज आणि दळणवळणाची साधने या त्यांच्या मुलभूत गरजा आहेत.
राखीव भूखंडाचा आभाव असल्याने मनोरंजनासाठी आणि करमणुकीसाठी येथील नागरिकांना डोंबिवलीच्या मध्यवर्ती भागात अथवा कोपर रोड, सखाराम नगरच्या लहान मुलांच्या उद्यान्यांवर अवलंबून राहावे लागते. अरुंद रस्ता आणि प्रतिसाद कमी असल्याने या ठिकाणी केडीएमटीची परिवहनची बस सेवा बंद करण्यात आली. आता
येथील रहिवाशांची सर्व मदार ही रिक्षांवरच आहे.
या ठिकाणीच महापालिकेचा कच-यापासून खत निर्मितीचा प्रकल्प होता, परंतु स्थानिकांमधील हेवेदावेसह अन्य काही कारणांमुळे तो बंद पडला. परिसरातीलच एका महिला संस्थेला तो चालविण्यासाठी देण्यात आला होता. तो ही त्यामुळे शहरात आता महापालिकेचा खत निर्मितीचा प्रकल्प नाही. केडीएमसीत कचऱ्याची समस्या जटील असतांना हा खत प्रकल्प बंद कसा पडला, असा सवाल नगरसेवकालाही विचारण्यात येतो. पण त्याचे उत्तर नाही.

Web Title: Cleanliness, traffic problems in Anna Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.