ठाण्यातील १३ हजार रिक्षाचालकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:36 AM2021-06-10T00:36:31+5:302021-06-10T00:37:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणार्या ८४ हजार ४५६ परिमटधारक रिक्षाचालकांपैकी केवळ १७ हजार ९३० ...

Clear the way for subsidy for 13,000 rickshaw pullers in Thane | ठाण्यातील १३ हजार रिक्षाचालकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा

८६ हजारपैकी १८ हजार परिमटधारकांनी केले अनुदानासाठी अर्ज

Next
ठळक मुद्दे ८६ हजारपैकी १८ हजार परिमटधारकांनी केले अनुदानासाठी अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणार्या ८४ हजार ४५६ परिमटधारक रिक्षाचालकांपैकी केवळ १७ हजार ९३० रिक्षाचालकांनी दीड हजार रु पयांच्या अनुदानासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) आॅनलाइन अर्ज केला आहे. त्यापैकी १३ हजार २४० अर्जांना प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाल्याने त्यांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. रिक्षाचालकांना आता त्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग होण्यास सुरु वात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने दीड हजार
रु पयांचे अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान त्यांना मिळण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे आणि जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २७ मे रोजी ठाणे विभागात अर्ज घेण्यासाठी सुरु वात झाली. ठाणे विभागात ८४ हजार ४५६ परमीटधारक रिक्षाचालक आहेत. त्यापैकी १७ हजार ९३० रिक्षाचालकांनी अनुदानासाठी अर्ज केला आहे. या अनुदानासाठी रिक्षाचालकांनाही काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काही रिक्षाचालकांचे मोबाइल, आधार लिंक बँक खात्याला जोडलेली नाही. काही रिक्षाचालकांच्या नावात तफावत असल्याचीही बाब समोर आली आहे. त्यामुळे चार हजार ६७० रिक्षाचालकांच्या अनुदानाचा निर्णय सर्व बाबींची पूर्तता होईपर्यंत स्थिगत ठेवण्यात आला आहे. मात्र, १३ हजार २४० रिक्षाचालकांनी पूर्तता केल्याने त्या अर्जांना आरटीओने मान्यता दिली आहे. त्यापैकी काही रिक्षाचालकांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. इतरांना ते येत्या काही दिवसांत मिळेल, अशी माहिती आरटीओच्या सूत्रांनी दिली.
* अनुदानासाठी ३० कर्मचाऱ्यांची फौज
अर्ज भरताना काही रिक्षाचालकांनी आधार लिंक बँक खात्याला जोडलेली नाही. जो मोबाइल नंबर आधार कार्डला जोडला आहे, तो नंबर आता त्यांच्याकडे नसल्याने ओटीपी मिळविणे कठीण होत आहे. अशा अडचणींवर मात करून रिक्षाचालकांना अनुदान मिळावे, यासाठी आरटीओचे ३० कर्मचारी राबत आहेत. पूर्वी २० कर्मचाºयांची फौज होती. त्यामध्ये १० जणांची वाढ केली आहे.

अनुदान मिळण्याबाबत रिक्षाचालकांना तांत्रिक किंवा इतर अडचणी येतील, त्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात कोणावर अन्याय होणार नाही. ठाण्यातील 13 हजार 240 रिक्षाचालकांच्या अनुदानाचा मार्ग आतापर्यंत मोकळा झाला आहे.
विश्वंभर शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

Web Title: Clear the way for subsidy for 13,000 rickshaw pullers in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.