उल्हासनगर महापालिका शाळा क्र १८ व २४ च्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा, अर्थसंकल्पात ६ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 04:00 PM2020-09-17T16:00:39+5:302020-09-17T16:08:56+5:30
शाळा पुनर्बांधणीसाठी अर्थसंकल्पात ६ कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून शेकडो मुलांना दिलासा मिळाला.
सदानंद नाईक
उल्हासनगर - शहर विकास आराखड्यानुसार बाधीत झाल्याने पुनर्बांधणी रखडलेल्या महापालिका शाळा क्रं -१८ व २४ चा मार्ग मोकळा झाला. शाळा पुनर्बांधणीसाठी अर्थसंकल्पात ६ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून शेकडो मुलांना दिलासा मिळाला.
उल्हासनगर महापालिका शाळेच्या बहुतांश इमारती धोकादायक झाल्याने, शाळा पुनर्बांधणीच्या मागणीने जोर धरला. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रथम शाळा पुनर्बांधणी साठी विशेष निधीची तरतूद सुरू केली. त्यांच्या कालावधीत काही शाळा इमारती बांधण्यात आल्या. कॅम्प नं-२ खेमाणी परिसरातील मराठी व हिंदी माध्यमाची शाळा क्रं -१८ व २४ ची इमारत धोकादायक झाल्याचे उघड झाल्यावर, इमारत पुनर्बांधणीसाठी ४ कोटोची तरतूद गेल्या वर्षी अर्थसंकल्पात केली. शैक्षणिक सत्र सुरू असताना शाळेतील शेकडो मुलांना दुसऱ्या शाळेत तात्पुरते हलवून शाळा इमारत निष्कासित केली. मात्र शाळा इमारत पुनर्बांधणी वेळी सदर शाळा इमारतीचा काही भाग शहर विकास आराखड्याला बाधीत होत असल्याच्या तक्रारी जागृत नागरिक व राजकीय पक्षांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या. तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शाळा इमारतीच्या बांधकाम परवानगी प्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. तेव्हा पासून शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी रखडली होती.
महापालिका अर्थसंकल्पात शाळा क्रं -१८ व २४ च्या पुनर्बांधणीसाठी पुन्हा २ कोटीची तरतूद केल्याने शाळा पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला. शाळा इमारतीसाठी एकून ६ कोटीचा निधी मंजूर असून रिंग रस्त्याला बाधीत होणारी जागा सोडून इतर जागेवर शाळा बांधकाम सुरू होण्याचे संकेत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी दिले. शाळा पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला असून शेकडो शालेय मुलांना हक्काची शाळा मिळणार आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या शाळेत स्थलांतरीत केलेल्या मुलाचे शैक्षणिक नुकसान झाल्याची टीका महापालिका कारभारावर झाली होती. कोरोना महामारी मध्ये शाळा बंद असल्याने, शाळा बंद कालावधीत शाळा उभारावी अशीही मागणी सर्वस्तरातून होत आहे.
रिंग रस्त्याला बाधीत शाळा वादात
महापालिका शाळा क्रं १८ व २४ मध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुनर्बांधणीच्या नावाखाली शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याने, मुलांना इतर शाळेत हलविण्यात आले. शाळा इमारत वेळेत उभी राहिली नाहीतर, मुलांच्या संख्येला गळती लागण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच रिंगरोडने बाधीत झालेली शाळा इमारत वादात सापडल्याची टीका शहरातून होत असून शेकडो मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा पुनर्बांधणीचा मागणी होत आहे.
मनसे आणि शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार; ठाणेकरांना दिलेली आश्वासन पूर्ण करा अन्यथा...
"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला
Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल
भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...