ठाण्याच्या वागळे आगारात परिवहनचे वाहक करतायंत क्लार्कचे काम

By अजित मांडके | Published: January 10, 2024 04:43 PM2024-01-10T16:43:43+5:302024-01-10T16:44:16+5:30

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन १२३ इलेक्ट्रीक बसपैकी १०६ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

Clerk's work as a carrier of transport in thane mumbai | ठाण्याच्या वागळे आगारात परिवहनचे वाहक करतायंत क्लार्कचे काम

ठाण्याच्या वागळे आगारात परिवहनचे वाहक करतायंत क्लार्कचे काम

अजित मांडके, ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन १२३ इलेक्ट्रीक बसपैकी १०६ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यातील ९९ बस रस्त्यावर धावत आहेत. परंतु उर्वरीत बसवर वाहक नसल्याने त्या उभ्या आहेत. तिकडे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या एकूण बसपैकी केवळ ५० बस आजच्या घडीला रस्त्यावर धावत आहेत. तर जुन्या ठेकेदाराच्या देखील १८० ते २०० बस रस्त्यावर धावत आहेत. परंतु परिवहनच्या स्वत:च्या बस रस्त्यावर धावत नसल्याने त्याचा फटका परिवहनला उत्पन्नाच्या स्वरुपात तर बसत आहेच, शिवाय परिवहनच्या ताफ्यात असलेले वाहक बसून आहेत. त्यातील ६० ते ७० वाहक सध्या वागळे आगारात क्लार्क व इतर अकाऊंटची कामे करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातही केवळ इलेक्ट्रीक बस जास्तीत जास्त रस्त्यावर उतरविण्यासाठी देखील परिवहन आपल्या ताफ्यातील बस बाहेर काढत नसल्याचा सुर आळवला जात आहे.

टीएमटीमध्ये प्रदुषण रोखण्यासाठी ेइलेक्ट्रीक बस दाखल होत आहेत. त्यानुसार आतापर्यंत १०६ ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यातील ९९ बस रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यातही या बसवर वाहक नसल्याने ७ बस आजही कोपरी येथील आगारात पडून आहेत. या बसवर देखील टीएमटीचे वाहक असून तरीसुध्दा या बसवर वाहक कमी असल्याने परिवहनचे रोजच्या रोज दिड ते दोन लाखांचे नुकसान होत असल्याची माहिती परिवहनच्या सुत्रांनी दिली आहे. परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ठेकेदाराच्या २४०, परिवहनच्या स्वत:च्या १५० च्या आसपास, व्होल्वो ३०, इलेक्ट्रीक १०६ बस आहेत. परंतु रस्त्यावर प्रत्यक्षात ३५० च्या आसपास धावत आहेत. परिवहनमधून रोज २ ते अडीच लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. परंतु सध्या परिवहनची स्थिती फारच बिघडल्याचे चित्र दिसत आहे.

परिवहनच्या ताफ्यात इलेक्ट्रीक दाखल झाल्या असल्याने ती जमेची बाजू असली तरी देखील यातून मिळणाºया उत्पन्नाचा मोठा वाटा हा ठेकेदाराला मिळत आहे. तर त्याचा कमी फायदा हा परिवहनला मिळत आहे. असे असतांना देखील इलेक्ट्रीक बसला जास्त महत्व देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. दुसरीकडे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या बसपैकी यापूर्वी १५३ बस या जुन्या झाल्याने भंगारात काढण्यात आल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी आणखी १७ बस भंगारात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यात अवघ्या ५० बस या रस्त्यावर धावत आहेत. दुसरीकडे ठेकेदारकडे असलेल्या २४० बस पैकी १८० ते २०० बस रस्त्यावर धावत आहेत. किंबहुना त्याच्याही बस आता रस्त्यावर धावणे काही प्रमाणात कमी झाले आहे. त्याचा फटका परिवहनला बसत आहे. परिवहनचे वाहक बसून असल्याचे चित्र वागळे, कळवा, मुल्लाबाग आगारात दिसत आहे. त्यातही यातील काही वाहक हे करारानुसार इलेक्ट्रीक बसवर धाडले गेले आहेत.

वाहक करतायत क्लार्कचे काम:

त्यातही वागळे आगारात मागील काही वर्षात क्लार्क मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच इतर पदे देखील खाली झाली आहेत, त्यामुळे बसून असलेल्या वाहकांना आता थेट क्लार्कची कामे करावी लागत आहेत. तसेच कॅशीअरचे कामही काही वेळेस करावे लागत आहेत, रिपोर्ट तयार करणे, तिकीटांचा हिशोब जोडणे आदींसह आस्थापनावर देखील वाहकांना कामाला लावण्यात आल्याची बाब समोर आली आहे. आजही याठिकाणी ६० ते ७० वाहक काम करीत असल्याची माहिती परिवहनच्या सुत्रांनी दिली.

व्होल्वोच्या३० पैकी १० बस रस्त्यावर :

परिवहनच्या ताफ्यात ३० वातानुकुलीत व्होल्वो आहेत, खºया मात्र त्यातील २० बस किरकोळ दुरुस्तीसह मोठ्या दुरुस्तीसाठी मुल्लाबाग आगारात धुळ खात पडून आहेत. त्यामुळे याचा फटका देखील परिवहनला बसत असल्याचे चित्र आहे. या बस ठाणे ते बोरीवली या सर्वाधिक उत्पन्न देणाºया मार्गावर सोडल्या जात आहेत. मात्र सध्या त्याची संख्या देखील १० वर आली आहे.

Web Title: Clerk's work as a carrier of transport in thane mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.