चातुर्याने केली स्वत:ची सुटका

By Admin | Published: August 21, 2015 11:28 PM2015-08-21T23:28:06+5:302015-08-21T23:28:06+5:30

वसईत राहुल बेरा (१५) या शाळकरी मुलाचे बाळू मुंडे, सचिन आणि विकी यादव या तीन आरोपींनी तो शाळेत जात असताना आम्ही तुझ्या वडिलांचे

Clever self rescued | चातुर्याने केली स्वत:ची सुटका

चातुर्याने केली स्वत:ची सुटका

googlenewsNext

पारोळ : वसईत राहुल बेरा (१५) या शाळकरी मुलाचे बाळू मुंडे, सचिन आणि विकी यादव या तीन आरोपींनी तो शाळेत जात असताना आम्ही तुझ्या वडिलांचे आम्ही मित्र आहोत, आम्ही तुला शाळेत सोडतो, असे सांगत महिंद्रा टेम्पोमध्ये बसवून अपहरण केले. त्याला लातूर येथे नेत असताना राहुलने बुद्धिचातुर्याने एका अपहरणकर्त्याचे मत बदलविले. एवढेच नव्हे तर गावकऱ्यांच्या मोबाइलवरून वडिलांना फोन करून अहमदनगर येथून स्वत:ची सुटका करून घेतली. या प्रकरणी पोलिसांनी विकी यादव या आरोपीला ताब्यात घेतले असून बाळू मुंडे व सचिन हे दोघे फरार आहेत.
राहुलचे वडील उत्तम बेरा हे सोन्याचे व्यापारी असल्यामुळे या आरोपींची त्यांच्या दुकानात ये-जा होती. म्हणून राहुलही या आरोपींच्या परिचयाचा झाला होता. म्हणून त्यांनी पाच लाखांच्या खंडणीसाठी राहुल याचे शाळेत जात असताना अपहरण केले. वडिलांच्या परिचयाचे हे लोक असल्याने राहुलला त्यांच्या विषयी शंका आली नाही. मात्र, अपहरण झाल्यानंतर त्याने आपल्या चातुर्याने स्वत:ची सुटका करुन घेतली,

वसईतून निघताना त्याला सांगितले की, तुझ्या जीवाला धोका आहे. म्हणून तुझ्या वडिलांनी आम्हाला तुला घेऊन जाण्यासाठी पाठविले आहे. पण, सातिवली सोडली असता तुझ्या वडिलांकडून आम्हाला पाच लाख रुपये येणे आहे. ते पैसे देत नसल्यामुळे आम्ही तुझे अपहरण करत आहोत, असे बाळूने राहुलला सांगत त्याच्या अंगावर चाकू ठेवत तू चूपचाप राहा, नाहीतर तुला मारून रस्त्याच्या कडेला फेकून देऊ, अशी धमकी दिली.

राहुल या धमकीला घाबरण्याचे नाटक करून गप्प राहिला. भूक लागली असता एका ढाब्यावर त्यांनी महिंद्रा टेम्पो ही गाडी थांबवून या ढाब्यावरील माणसे आमची आहेत. कोणतीही गडबड केलीस तर तुझा आम्ही जीव घेऊ, असे पुन्हा धमकावले. त्यानंतर रात्रीचा प्रवास करत सकाळी गाडी हडोली, अहमदनगरमध्ये आली असता डिझेल कमी झाल्याने गाडी एका निर्जन जागी गाडी थांबवून डिझेलसाठी पैसे आणण्यासाठी बाळू एटीएमच्या शोधात बाहेर गेला. त्या वेळी सचिन व विकी यादव दोघेच गाडीत होते. तेव्हा सचिन याने मी गावात जाऊन दारू पिऊन येतो, असे विकीला सांगत चाकू त्याच्या हातात दिला. राहुलनेही ही संधी साधत मला सोड, मी तुला माझ्या वडिलांकडून मोठी रक्कम मागून देतो व पोलिसांपासूनही तुझे संरक्षण करतो, अशी त्याची मनधरणी करून त्यास तयार के ले.

यानंतर, उर्वरित दोघे आरोपी यायच्या आत त्यांनी गाडी हडोली पोलीस चौकीजवळ नेली. मात्र, ही चौकी बंद असल्यामुळे पुढे जलकोट पोलीस ठाणे आहे, अशी गावकऱ्यांकडून राहुल याने माहिती घेऊन त्यांच्या मोबाइल नंबरवरून वडिलांना फोन लावून आपला ठावठिकाणा सांगितला. ही माहिती मिळताच उत्तम बेहरा व माणिकपूर पोलिसांनी जलकोट पोलीस ठाणे (लातूर) गाठले व राहुलची सुखरूप सुटका करून विकी यादव याला ताब्यात घेतले.

(वार्ताहर)

Web Title: Clever self rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.