आॅनलाइन फार्मसीविरोधात आज बंद
By admin | Published: May 30, 2017 05:02 AM2017-05-30T05:02:43+5:302017-05-30T05:02:43+5:30
आॅनलाईन फार्मसीविरोधात औषध विक्रेते ३० मे रोजी एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळणार आहेत. त्या दिवशी रुग्णालयाशेजारची
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: आॅनलाईन फार्मसीविरोधात औषध विक्रेते ३० मे रोजी एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळणार आहेत. त्या दिवशी रुग्णालयाशेजारची औषधाची दुकाने सुरु राहणार आहेत. राज्यातील ५५ हजार, ठाणे जिल्ह्यातील पाच हजार आणि कल्याण-डोंबिवलीतील ७०० औषध विक्रेत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती केमिस्ट असोशिएशन आॅफ ठाणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी असोशिएशनचे चिटणीस विजय सुराणा, कल्याणचे अध्यक्ष विनय खटाव उपस्थित होेते. आॅनलाईन व ई फार्मसीमुळे झोपेच्या गोळ््या, ड्रग्ज आणि गर्भपाताची औषधे सहज विकत घेतली जाऊ शकतात. त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे आॅनलाईन व ई फार्मसी औषध विक्रीला विक्रेत्यांचा विरोध आहे. आॅनलाईन विक्रीत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकत घेतली जाऊ शकतात. त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ई फार्मसीमध्ये बनावट औषधे विकली जाण्याचा धोका जास्त आहे. आॅनलाईन व ई फार्मसीत डॉक्टरांची चिठ्ठी योग्य आहे की नाही, याची तपासणी करणारी यंत्रणा सरकारकडे नाही.
आॅनलाईन व ई फार्मसीला विरोध करण्यासाठी विविध औषध विक्रेत्यांनी विरोध दर्शविणारी ५० ते ६० पत्रे सरकारला लिहिली आहेत. औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व आमदार जगन्नाथ शिंदे यांनी हा प्रश्न संसदेपर्यत नेला. खासदार राजन विचारे व श्रीकांत शिंदे यांनी या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले, असे सांगण्यात आले. मुंबईच आझाद मैदानात मूक धरणे धरले जाईल.
आॅनलाईन व ई फार्मसीत भरली जाणारी माहिती कितपत सुरक्षित आहे. या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. आॅनलाईन व ई फार्मसी औषध विक्री ही शहरात केली गेली तरी ग्रामीण भागाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. तेथे इंटरनेट आॅफलाईन असते. तसेच विजेची समस्या आहे. ग्रामीण भागाला त्याचा काही उपयोग होणार नाही.