मलनि:सारण प्रक्रिया केंद्र बंद

By admin | Published: October 8, 2015 12:16 AM2015-10-08T00:16:04+5:302015-10-08T00:16:04+5:30

खडेगोळवली येथील महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रीया केंद्राचे काम भुयारी गटारी तुंबल्याने बंद पडले आहे. त्यामुळे शहरतील ६८ एमएलडी सांडपाणी थेट नाल्यात सोडले

Closure: Turn off the processing center | मलनि:सारण प्रक्रिया केंद्र बंद

मलनि:सारण प्रक्रिया केंद्र बंद

Next

- सदानंद नाईक,  उल्हासनगर

खडेगोळवली येथील महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रीया केंद्राचे काम भुयारी गटारी तुंबल्याने बंद पडले आहे. त्यामुळे शहरतील ६८ एमएलडी सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र हे केंद्र व भुयारी गटारीवर कोट्यवधीचा खर्च केल्याचे दाखविले जात आहे. शहरात महाराष्ट्र पाणीपुरवठा मलनि:सारण योजने अंतर्गत सन-१९८४ ते ९३ साला दरम्यान भुयारी गटारी योजना राबविली आहे. सन-१९९३ सालची ३ लाख ६० हजार लोकसंख्या गृहित धरून २८ द.ल.लीटर क्षमतेची योजना कार्यान्वीत केली. आजमितीस शहराची लोकसंख्या १० ते ११ लाख आहे. भुयारी गटारीची क्षमता संपल्याने जागोजागी ओव्हर फलो होऊन गटारी तुंबल्या आहेत. शहरात एकूण ६८ एमएलडी सांडपाणी निर्माण होत आहे. तर २८ क्षमतेचे खडेगोळवली येथील मलनिसा:रण केंद्र भुयारी जलवाहिन्या तुंबल्याने बंद पडले आहे. सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्यावत मलनिसा:रण केंद्र उभारण्याची मागणी सर्वस्तरातून होत असून आयुक्त मनोहर हिरे यांनी केंद्र बांधण्याला प्राध्यान्य देणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच बहुतांश इमारतीतील व घरातील शौचालयांना सेफटी टँक नसल्याने सांडपाणी उघडया नाल्यात सोडले जात असल्याचे पर्यावरण अहवालात म्हटले आहे. भुयारी गटाराची क्षमता संपली असून त्या तुंबल्याने पावसाळयात ओव्हर फलो होत आहे. बहुतेक इमारती व घरातील शौचालयांना सेफटी टँक नसलयाने ते सक्तीचे करणे गरजे झाले आहे. पालिका आरोग्य विभागाने सेफटी टँक नसणाऱ्या इमारती व घरांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा मानस मुख्य स्वच्छता निरिक्षक विनोद केणे यांनी व्यक्त केला आहे. भुयारी गटारींची नवी योजना तातडीने राबविली नाहीतर आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे गटारी तुंबल्याचा अहवाल पालिकेकडे भुयारी गटारीची निगा राखण्यासाठी स्वत:चा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व अत्याधुनिक यंत्र सामुग्री नसल्याने कोटयावधीचा खर्च गटरी दुरस्तीवर केला जात आहे. खडेगोळवली मलनि:सारण केंद्र बंद असूनही त्यावर कोटयावधीचा खर्च पालिका करीत असल्याचे उघड झाले आहे. मलनिसा:रण केंद्र गटारी तुबंल्याने बंद असल्याची माहिती कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली आहे. मग त्यावर खर्च कशासाठी होतो, असा प्रश्न निर्माण झाला असून त्याच्या चौकशीचे मागणी होत आहे.

Web Title: Closure: Turn off the processing center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.