क्लस्टरला आता मिळणार सिडकाेसह म्हाडाचा बूस्टर, तीन नवे प्रस्तावही मंजूर, ठामपाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 05:42 AM2020-12-24T05:42:08+5:302020-12-24T05:43:41+5:30
Thane : पहिल्या टप्प्यात असलेल्या सहा आराखड्यांच्या ठिकाणी वागळे इस्टेट भागात औद्योगिक वसाहतीमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयाची आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वापरात असलेली जमीन आता क्लस्टरसाठी घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
ठाणे : शहरातील बहुचर्चित समूह पुनर्विकास योजनेच्या (क्लस्टर) अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडा आणि सिडकोची मदत घेण्यास ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. यामुळे शहराचा नियोजनबद्ध विकास होऊन क्लस्टरला मोठा बूस्टर मिळणार आहे.
क्लस्टरच्या १२ आराखड्यांना यापूर्वीच अंतिम मान्यता दिली असतानाच त्यापाठोपाठ आता
तिसऱ्या टप्प्यात आणखी नऊ नागरी पुनर्निमाण आराखड्यांना ती
दिली आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या सहा आराखड्यांच्या ठिकाणी वागळे इस्टेट भागात औद्योगिक वसाहतीमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयाची आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वापरात असलेली जमीन आता क्लस्टरसाठी घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
आता तिस-या टप्प्यातील ज्या नऊ आराखड्यांना अंतिम मंजुरी दिली आहे, त्यामध्ये उपवन २, मानपाडा २, कोकणीपाडा १, भीमनगर व कोकणीपाडा २, तसेच सेक्टर-९
मधील मुंब्रा १ व कौसा तसेच सेक्टर-११ मधील शीळ या भागांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात असलेल्या सहा आरखड्यांच्या ठिकाणी वागळे इस्टेट भागात औद्योगिक वसाहतीमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयाची आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वापरात असलेली जमीन आता क्लस्टरसाठी घेण्याचा प्रस्तावही यावेळी मंजूर केला. या अनुषंगाने लोकमान्यनगरातील रेप्टॉकॉस कंपनीची जागाही यासाठी आरक्षित करावी, अशी मागणी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली. किंबहुना, क्लस्टरच्या ज्या काही चतु:सीमा असतील, त्या ठिकाणचीदेखील आरक्षणे ताब्यात घ्यावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यानुसार, कार्यवाही केली जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.