ठाण्यातच नव्हे, मुंबईतही क्लस्टर; एकनाथ शिंदे यांची घाेषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 06:28 AM2023-06-06T06:28:46+5:302023-06-06T06:29:43+5:30

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन किसननगर येथे पार पडले.

cluster not only in thane but also in mumbai cm eknath shinde declared | ठाण्यातच नव्हे, मुंबईतही क्लस्टर; एकनाथ शिंदे यांची घाेषणा

ठाण्यातच नव्हे, मुंबईतही क्लस्टर; एकनाथ शिंदे यांची घाेषणा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : किसनगरमध्ये १९९७ मध्ये झालेल्या साईराज इमारत दुर्घटनेनंतर क्लस्टरचे स्वप्न पाहिले. ते आता प्रत्यक्षात येत आहे. ठाण्यातच नव्हे, तर  मुंबई, मीरा-भाईंदरलाही क्लस्टर राबविले जाणार आहेत. पावसाळ्यानंतर त्याला सुरुवात केली जाईल,  अशी घाेषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केली. तसेच कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि उल्हासनगर या एमएमआर क्षेत्रातही क्लस्टर योजना राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन किसननगर येथे सोमवारी पार पडले. यावेळी दुर्घटनाग्रस्त साईराज इमारतीतील एका कुटुंबाच्या हस्तेही नारळ वाढवण्यात आला. क्लस्टर याेजनेचे कार्यालय कशीश पार्क येथे सुरू करण्यात आले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री शंभूराज देसाई, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. कुमार केतकर, आ. प्रताप सरनाईक, आ. संजय केळकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी, महापालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले की, प्रत्यक्षात घराची चावी दिली जाईल, ताे दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा असेल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे असते तर त्यांनी पाठ थाेपटली असती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या याेजनेला तत्त्वत: मान्यता मिळाली. खऱ्या अर्थाने २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी त्यातील त्रुटी दूर केल्या. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्लॉट उपलब्ध केल्याचे ते म्हणाले.

पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावणार

मुंबईत जे पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत, ते प्रकल्प मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी सिडको, म्हाडा, मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. जे प्रकल्प विकासकाने अर्धवट सोडले, ते सुरू करू. मुंबईबाहेर गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणू, असेही ते म्हणाले.

पहिल्या टप्प्यात १० हजार घरे

आता निवडणुका नाहीत, तरी प्रत्यक्षात क्लस्टरचे काम सुरू केले असल्याचे सांगत पहिल्या टप्प्यात दहा हजार घरे बांधणार असून, १,५०० हेक्टर जागेवर ही याेजना राबवली जाणार आहे.


 

Web Title: cluster not only in thane but also in mumbai cm eknath shinde declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.