मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली टेंभीनाक्यावरील दुर्गेश्वरीची महाआरती
By अजित मांडके | Published: September 30, 2022 04:33 PM2022-09-30T16:33:00+5:302022-09-30T16:34:39+5:30
महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव. त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात गुरुवारी उध्दव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने टेंभी नाका देवीची महाआरती करुन एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले असतांनाच शुक्रवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह देवीची विधिवत पुजा केली. तसेच महाआरती देखील केली. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव. त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांच्या समवेत वडील संभाजी, पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातू आदींसह कुटुंबातील इतर सदस्य या पुजेत सहभागी झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास ही पुजा सुरु झाली. तर साडेतीन वाजता महाआरती घेण्यात आली. यावेळी शिंदे गटातील महत्वाचे पदाधिकारी व इतर कार्यकत्र्यानी टेंभीनाक्यावर गर्दी केली होती. दरम्यान गुरुवारी उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाक्यावर हजेरी लावून देवीची महाआरती केली होती. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केले. तसेच सभा मंडपातच घोषणाबाजी देखील केली होती.
त्यानंतर शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच विधिवत पुजा केली व महाआरती देखील केली. जवळ जवळ तासभर हा कार्यक्रम सुरु होती. परंतु यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आम्ही केले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दरवर्षी देवीची पुजा केली जाते. त्यानुसार या वर्षी देखील ती पुजा व महाआरती करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाच्या पदाधिका:यांनी दिली. परंतु हे कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन नव्हते असेही शिंदे गटाच्या पदाधिका:यांनी सांगितले. यावेळी शिंदे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी टेंभी नाक्यावर हजेरी लावल्याचे दिसून आले.