मन जिंकलंत! सीएम एकनाथ शिंदेंनी पावसात भिजत ठाणे पोलिसांच्या बँड पथकाकडून स्वीकारली मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:57 PM2022-07-05T18:57:17+5:302022-07-05T18:58:31+5:30

Eknath Shinde : सामान्य नागरिकांमधून झालेल्या या मुख्यमंत्र्यांनी छत्री नाकारून भिजत पोलिसांची मानवंदना स्वीकारली. त्यामुळे तळागाळातील सर्व सामान्य जनतेची मनं शिंदे सरकारने जिंकली आहे. 

CM Eknath Shinde received a salute from Thane police band in raining | मन जिंकलंत! सीएम एकनाथ शिंदेंनी पावसात भिजत ठाणे पोलिसांच्या बँड पथकाकडून स्वीकारली मानवंदना

मन जिंकलंत! सीएम एकनाथ शिंदेंनी पावसात भिजत ठाणे पोलिसांच्या बँड पथकाकडून स्वीकारली मानवंदना

Next

ठाणे : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच ठाण्यातील घरातून आज सकाळी बाहेर पडले. त्यावेळी त्यांना ठाणे पोलिसांच्या बंद पथकाकडून मानवंदना देण्यात आली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भरपावसात भिजत पोलिसांच्या बंद पथकाकडून दिली जाणारी मानवंदना स्वीकारली.   

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घरातून बाहेर पडल्यानंतर अति महत्वाच्या व्यक्तींसाठी असणारे सुरक्षा कवच याच्यासह ताफ्यासोबत होते. मुख्यमंत्री या नात्याने त्यांना पावसात भिजू नये म्हणून सफारी ड्रेस परिधान केलेल्या व्यक्तीने शिंदेंसाठी छत्री पकडली होती. पण सामान्य नागरिकांमधून झालेल्या या मुख्यमंत्र्यांनी छत्री नाकारून भिजत पोलिसांची मानवंदना स्वीकारली. त्यामुळे तळागाळातील सर्व सामान्य जनतेची मनं शिंदे सरकारने जिंकली आहे. 

ठाण्यात पोलिसांच्या बँड पथकाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानवंदना पावसात भिजत मुख्यमंत्र्यांनी मानवंदना स्विकारली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्व सामान्य लोकांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असून एकनाथ शिंदेंनी शहरात पावसाचा आढावा घेतला. ज्या जिल्ह्यात पावसाचां जोर जास्त आहे, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच एनडीआरएफचे पथकही तैनात करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

एक कट्टर शिवसैनिक आणि लोकांमध्ये रमणारा नेता अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ते सोमवारी ठाण्यात परतले. यावेळी एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. ठाण्यात काल पावसाची रिपरिप सुरू असतानाही ठिकठिकाणी ढोल ताशे आणि फुलांच्या वर्षावात एकनाथ शिंदेंची विजयी मिरवणूक काढण्यात आली. तब्बल १५ दिवसांनी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शक्ती स्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंद नगर चेक नाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर आपल्या ५० समर्थक आमदारांसह ते थेट आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर दाखल झाले. दरम्यान, मिसेस मुख्यमंत्र्यांचाही म्हणजेच लता शिंदे यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी चक्क ड्रम वाजवत जल्लोष साजरा केला.

 

Web Title: CM Eknath Shinde received a salute from Thane police band in raining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.