‘महावितरण’च्या अभियंत्याला मनसेकडून कोळसा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:53 AM2017-10-07T00:53:43+5:302017-10-07T00:55:57+5:30
भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गुजरातमधील निवडणुकांमुळे हा निर्णय घेतला असेल, तर ते चुकीचे आहे. डोंबिवलीतील नागरिक ते सहन करणार नाहीत
डोंबिवली : भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गुजरातमधील निवडणुकांमुळे हा निर्णय घेतला असेल, तर ते चुकीचे आहे. डोंबिवलीतील नागरिक ते सहन करणार नाहीत, असा इशारा देत मनसेने शुक्रवारी ‘महावितरण’च्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला कोळसा भेट देत आंदोलन केले.
कोळशाचे भाव वाढवण्यासाठी असे भारनियमन केले जाते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी म्हणाले होते. तर, मग आताही तोच उद्देश आहे का, असा सवाल उपाध्यक्ष राजेश कदम यांनी ‘महावितरण’चे एमआयडीसीतील ‘महावितरण’च्या मुख्य कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश कलढोणे यांना केला. दरम्यान, या आंदोलनावेळी मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, प्रतिभा पाटील, गटनेते प्रकाश भोईर, राहुल कामत आदी मान्यवर उपस्थित होते.