अंबरनाथमधील काँक्रिट रस्त्यांचा दर्जा घसरणार; सर्व निविदा 10ते 15 टक्के कमी दराच्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 08:13 PM2017-10-27T20:13:11+5:302017-10-27T20:13:49+5:30
अंबरनाथमधील महत्वाच्या काँक्रिट रस्त्यांची कामे मंजुर झाली असुन या रस्त्यांची कामे करण्यासाठी पालिकेने निविदाही मागविल्या आहेत.
अंबरनाथ - अंबरनाथमधील महत्वाच्या काँक्रिट रस्त्यांची कामे मंजुर झाली असुन या रस्त्यांची कामे करण्यासाठी पालिकेने निविदाही मागविल्या आहेत. मात्र काम मिळविण्याच्या राजकीय संघर्षात सर्व कामांच्या निविदा ह्या मंजुर दरापेक्षा 10 ते 14 टक्के कमी दराच्या आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामाचा दर्जा घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंबरनाथ शहरातील महत्वाच्या काँक्रिट रस्त्यांची कामे पालिकेने मंजुर केली. निधीची कमतरता असली तरी निधीची पुर्तत: होईल त्या प्रमाणो शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे धोरण पालिकेने घेतले आहे. त्यानुसार अंबरनाथ उलनचाळ रस्ता, अंबरनाथ गांवदेवी रस्ता, अंबरनाथ कमलाकरनगर रस्ता, पुर्व भागातील गॅस गोडाऊन रस्ता आणि वांद्रापाडा रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या निविदा मागविण्यात आले होते. हे सर्व निविदा मिळविण्यासाठी अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या दोन गटात आणि काँग्रेस पक्षात संघर्ष निर्माण झाला होता. या राजकीय संघर्षामुळे प्रत्येकाने मंजुर दरापेक्षा कमी दराची निविदा भरत हे काम मिळविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्न मुळे अनेक कंपन्यांनी अंदाजीत रक्कमेच्या 10ते 14 टक्के कमी दराची निविदा भरली आहे. या सर्व रस्त्यांची कामे कमी दराने गेल्याने आता त्याचा थेट परिणाम हा रस्त्याच्या कामाच्या दर्जावर होणार आहे. शहरातील काँक्रिट रस्ते दर्जेदार व्हावे ही सर्वसामान्यांची इच्छा राजकीय संघर्षामुळे धुळीस मिळाली आहे. निविदा ह्या कमी दराने गेल्याने आता ठेकेदार कंपनी आपला नफा कायम ठेवण्यासाठी कामाचा दर्जा घसरविण्याचा प्रय} करणार आहे. तर दुसरीकडे कामाचा दर्जा घसरूनये याची जबाबदारी ज्या पालिकेच्या अधिका-यांवर आहे तेच पालिकेचे अधिकारी अकार्यक्षम दिसत आहेत. काही रस्त्यांच्या कामावर लक्ष देऊन कामाचा दर्जा तपासणा-या अधिका-यांना धमकाविण्याचे प्रकार देखील या आधी अंबरनाथमध्ये झाले आहे. त्यामुळे ठेकेदार करेल ते काम योग्य अशी स्थित पालिकेत निर्माण झाली आहे. ठेकेदारांच्या दादागिरीमुळे पालिकेचे अधिकारी देखील रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासण्यास घाबरत आहे. अधिकारी हे ठेकेदाराला घाबरत असल्याने ठेकेदार कोणत्याही दर्जाचे काम केले तरी त्याचे बील अदा केले जात आहे. पालिकेच्या या स्थितीमुळेच शहरातील काँक्रिट रस्त्यांची कामे अत्यंत कमी दरात गेली आहेत. त्याचा सर्वात जास्त फटका हा शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामांच्या दर्जावर होणार आहे.
अंबरनाथमधील हुतात्मा चौकातील रस्त्याचे काँक्रिटीकरण पालिकेमार्फत केले जात आहे. मात्र हा रस्ता करित असतांना त्या रस्त्याचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट ठेवण्यात आला आहे. काँक्रिट रस्ते उभारतांना केवळ वरवर खडी टाकुन त्यावर काँक्रिट भरण्यात आले आहे. काँक्रिट रस्त्याचा खालचा भाग मजबुत नसल्याने त्याला लागलीच तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येवढेच नव्हे तर या कामासाठी रस्ता बंद असतांना देखील या रस्त्यावर रात्रीच्या वेळेसच काँक्रिट भरण्याचे काम केले गेले आहे. काँक्रिट भरतांना एकही अधिकारी जागेवर नसल्याने ठेकेदार करेल ते काम योग्य अशी स्थिती या रस्त्यावर निर्माण झाली आहे. सव्वा कोटींच्या या रस्त्यावर अधिका-यांचे निरिक्षणच नसल्याने कामाचा दर्जा निश्चित कोन करतणार अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. असाच काहीसा प्रकार अंबरनाथ शिवमंदिर रस्त्याच्या बाबतीत घडला आहे. स्वामी समर्थ चौक ते शिवमंदिर रस्त्यावर अवघ्या वर्ष दिड वर्षात काँक्रिट रस्ता खराब होण्यास सुरुवात झाले आहे. काँक्रिटचा वरचा थर निघुन खडी दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा रस्ता जास्त काळ टिकणो अवघड जाणार आहे. शहरातील काँक्रिट रस्त्यांची 5 वर्षाची जबादारी नियमानुसार ठेकेदाराची आहे. मात्र शहरातील अनेक रस्ते खराब झालेले असतांना देखील त्या रस्त्यांची दुरुस्ती पालिकेने करुन घेतलेली नाही. जबाबदारीपासुन दूर सरकेल्या अधिका-यांचा ठेकेदारावर वचक राहिलेले नाही असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. त्यामुळेच आधी झालेले काँक्रिट रस्ते आणि नव्याने होणारे रस्ते यांचा दर्जा निकृष्टच आहे हे स्पष्ट झाले आहे.