आचारसंहिता भंगाचे सहा गुन्हे दाखल
By admin | Published: February 18, 2017 06:41 AM2017-02-18T06:41:04+5:302017-02-18T06:41:04+5:30
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ६ गुन्हे दाखल
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी जवळपास ९ लाखांचे मद्य जप्त केले आहे. दरम्यान, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पालिका मुख्यालयातील कक्षाकडे ३५ तक्र ारी आल्या. त्यात मालमत्ता विदु्रपीकरणाचे ३ गुन्हे, अनधिकृत मंडपउभारणी, विनापरवाना प्रचार व मिरवणूक आदी तक्रारींचा समावेश आहे.
आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसंदर्भात स्थापन केलेल्या विशेष कक्षाप्रमाणेच शहरातील अतिमहत्त्वाची ठिकाणे, नाके या ठिकाणी चेकपोस्ट तयार करून त्या ठिकाणीही विशेष तपासणी पथके, गस्त पथके निर्माण केली आहेत. या पथकांमध्ये महापालिका, महसूल विभाग, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वेगवेगळ््या सभांचे व्हिडीओ शुटींग केले जात आहे. त्याची, जाहिरातींचही तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
दारू, शस्त्रे केली जप्त
च्पोलिसांनी ३६९१ लीटर उंची मद्य, २५,२७१ लीटर गावठी दारू, बीअर असा अंदाजे ८ लाख ४४ रुपयांचा माल जप्त केला आहे.
च्प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत पोलिसांनी १ गावठी कट्टा, २ कार्टेज, २ तलवारी आणि २ चॉपर जप्त केले आहेत.