ठाणे काँग्रेसमध्ये पुन्हा कोल्डवॉर

By Admin | Published: August 11, 2016 04:03 AM2016-08-11T04:03:08+5:302016-08-11T04:03:08+5:30

कित्येक महिने रखडलेली ठाणे शहर काँग्रेसची कार्यकारीणी जाहीर झाली असली तरी या जम्बो कार्यकारीणीवरुन आता मतभेद निर्माण झाले आहेत.

Cold War again in Thane Congress | ठाणे काँग्रेसमध्ये पुन्हा कोल्डवॉर

ठाणे काँग्रेसमध्ये पुन्हा कोल्डवॉर

googlenewsNext

ठाणे : कित्येक महिने रखडलेली ठाणे शहर काँग्रेसची कार्यकारीणी जाहीर झाली असली तरी या जम्बो कार्यकारीणीवरुन आता मतभेद निर्माण झाले आहेत. यापूर्वी ब्लॉक अध्यक्षांची निवड ही निवडणूक प्रक्रियेतून केली जात होती. परंतु, आता ती थेट केल्याने या प्रक्रियेला भेद दिल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे यापूर्वी निवडणुकीच्या प्रक्रियेतून निवडून आलेले ब्लॉक अध्यक्ष या नव्या निवडीच्या विरोधात आवाज उठविण्याच्या तयारीत आहेत. तसेच दुसरीकडे काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार दिल्याने आता त्याच्या विरोधात पक्षाने कारवाई करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
ठाणे शहर काँग्रेसची घडी बसावी आणि आपसातील मतभेद विसरुन पक्षातील प्रत्येक तरुण मंडळीसह इतर ज्येष्ठ मंडळीदेखील एक दिलाने कामाला लागावी म्हणून पक्ष श्रेष्ठींकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु, असे असतांना प्रभाग क्र. ३२ अ मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर यांनी अपक्ष उमेदवार उभा केला आहे. प्रत्यक्षात पक्षाने येथे अधिकृत उमेदवार दिला असतांना त्यांनी अशा पद्धतीने कार्यवाही केल्याने, शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे घाडीगांवकर यांनी या संदर्भात थेट प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे शिंदे यांच्या विरोधात पत्रव्यवहार केला आहे. केवळ शिवसेनेचा उमेदवार येथे निवडून यावा म्हणूनच प्रभागाच्या बाहेरील पदाधिकाऱ्याला तिकीट दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सातत्याने शिवसेनेशी छुपी युती करण्याचा घाट शहर अध्यक्ष घालत असून त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आपल्या करिष्म्यावर २५ नगरसेवक निवडून आणावेत, असा टोलाही लगावला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cold War again in Thane Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.