कोनगाव येथे १२० युनिट रक्त संकलित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:23 AM2018-08-22T00:23:17+5:302018-08-22T00:23:19+5:30

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे रक्तदान शिबिर

Collected 120 Unit Blood in Kogan | कोनगाव येथे १२० युनिट रक्त संकलित

कोनगाव येथे १२० युनिट रक्त संकलित

Next

कल्याण : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने कोनगाव येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे राबवलेल्या रक्तदान शिबिरात १२० युनिट रक्त संकलित करण्यात आले.
कोनगाव येथील शिबिरासाठी सर जे. जे. महानगर रक्तपेढीची मदत घेण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या डोंबिवली क्षेत्राचे प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या हस्ते झाले. कोनगाव व परिसरातील नागरिकांनीही या शिबिरात सहभाग घेतला. आमदार नरेंद्र पवार, संयोजक जगन्नाथ म्हात्रे यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, एखाद्या ठिकाणी आपत्ती आल्यानंतर रक्तदान किंवा आरोग्य शिबिरे भरवली जाताते. परंतु, संत निरंकारी मिशन सातत्याने रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे, असे समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. या मिशनतर्फे दरवर्षी २४ एप्रिलला रक्तदान शिबिरांची मालिका सुरू होते आणि ती पुढे वर्षभर चालू राहते.
हसबे म्हणाले, बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी स्वत: रक्तदान करून मिशनच्या रक्तदान अभियानाचा प्रारंभ १९८६ मध्ये केला. त्यावेळी त्यांनी रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नाही, अशी सूचना केली होती. निरंकारी भक्तांनी रक्तदानाला आपल्या भक्तीचे एक अंग मानले असून, त्यात सातत्याने मोठ्या संख्येने भाग घेतले आहेत. आजवर भक्तांनी १० लाखांहून अधिक युनिट रक्तदान केले आहे. मिशनच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून रक्तदानाचे कार्य मिशनद्वारे पुढे नेले जात आहे.
दरम्यान, पवई इंग्लिश हायस्कूल, आयआयटी, पवई येथील शिबिरात १५३ युनिट तर, नालासोपरा येथे ३०७ युनिट रक्त संकलित करण्यात आले. कोनगावचे शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी म्हात्रे, सेवादल संचालक प्रकाश कोकतरे, प्रबंधक चंद्रकांत दाभणे आदींनी मेहनत घेतली.

Web Title: Collected 120 Unit Blood in Kogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.