ठाण्यात झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलला; पहिल्यांदाच केला प्रायोगिक तत्वावर प्रयोग

By अजित मांडके | Published: December 22, 2023 02:55 PM2023-12-22T14:55:04+5:302023-12-22T14:55:13+5:30

ठाण्यातील काही महत्वाच्या चौकात सध्या हा प्रयोग केला गेला आहे. त्यातील तीन हात नाका हा भाग सर्वात वर्दळीचा ठरतो

Color of zebra crossing in Thane changed; It was first conducted on an experimental basis | ठाण्यात झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलला; पहिल्यांदाच केला प्रायोगिक तत्वावर प्रयोग

ठाण्यात झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलला; पहिल्यांदाच केला प्रायोगिक तत्वावर प्रयोग

ठाणे - ठाण्यात सध्या काही महत्वाच्या तसेच अधिक वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी महापालिका आणि वाहतुक पोलिसांच्या मदतीने येथील झेब्रा क्रॉसींगचा रंग बदलण्यात आला आहे. आधी पांढरा - काळा अशा स्वरुपात असलेला रंग आता पांढरा - लाल अशा स्वरुपात दिसू लागला आहे. त्यामुळे वाहन चालकही काहीसे सर्तक झाल्याचे दिसत आहे. त्यातही तीनहात नाका परिसरात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे वाहतुक पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे झेब्रा क्रासींगवर आता कोणी वाहने थांबवित नसून चुकून थांबली गेली तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात यापूर्वी सिग्नलच्या ठिकाणी किंवा इतर महत्वाच्या तसेच गर्दीच्या रहदारीच्या रस्त्यांवर पांढºया - काळ्या स्वरुपात झेब्रा क्रासींगचे पट्टे होते. काही ठिकाणी आजही ते कायम ठेवण्यात आले आहेत. परंतु आता ठाणे महापालिका आणि वाहुतक पोलिसांनी शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसींगचे रंग बदलले आहेत. आता पांढºया आणि लाल रंगात झेब्रा क्रॉसींग दिसू लागले आहेत. आता ते पटकन नजरेला येऊ लागले आहेत. तसेच वाहन चालक देखील यावरुन जातांना सावधानता बाळगत आहेत. शिवाय पादचाºयांना देखील रस्ता क्रॉसींग करणे यामुळे सोईचे झाल्याचे दिसत आहे.

ठाण्यातील काही महत्वाच्या चौकात सध्या हा प्रयोग केला गेला आहे. त्यातील तीन हात नाका हा भाग सर्वात वर्दळीचा ठरतो. याठिकाणी मुंबईहून ठाण्याकडे येणारी, ठाण्याहून मुंबईकडे जाणारी, ठाण्याहून मुलुंड एलबीएस दिशेला तसेच इतर मार्गांवर सतत वाहनांची वर्दळ ही तीन नाक्यावर येऊन सिग्नलवर थांबत असते. त्यामुळे सकाळ पासून अगदी रात्री पर्यंत येथे वाहतुक पोलीसांची तारेवरची कसरत सुरु असल्याचे चित्र दिसत असते. परंतु पहिला प्रयोग हा याच ठिकाणी करण्यात आला आहे. तसेच मधल्या चौकात म्हणजेच पुलाच्या मध्ये देखील फुटपाथ तयार करुन त्यालाही रंगही देण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फायदा झाला असून आता वाहन चालक देखील झेब्रा क्रॉसींगच्या पुढे जातांना दिसत नाहीत. किंवा जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी अशा वाहन चालकांवर तत्काळ कारवाई केली जात आहे. तसेच वाहन चालकांना देखील आता हा रंग पटकन दिसत असल्याचे वाहतुक विभागाचे म्हणने आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात तीन हात नाका परिसरात करण्यात आला आहे. त्यानंतर कॅडबरी जंक्शन, पुढे माजिवडा आणि इतर महत्वाच्या चौकातही हा प्रयोग केला जाणार आहे. तर सध्या तीन हात नाका, कोपरीतील काही महत्वाच्या रस्त्यांसह, राम मारुती रोड आदींसह इतर ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला आहे.

पूर्वी लोकांना पांढरे काळे स्वरुपातील झेब्रा क्रॉसींग फारसे दिसत नव्हते. तसेच नियमांचे देखील उल्लघंन केले जात होते. परंतु आता पांढºया - लाल स्वरुपातील या पट्यांमुळे वाहन चालक झेब्रा क्रॉसींग करीत नाहीत. तसेच झेब्रा क्रॉसींगवर वाहन उभे राहिल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाते. शहरातील विविध चौकात अशा स्वरुपाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. - डॉ. विनयकुमार राठोड - उपायुक्त, ठाणे शहर पोलीस - वाहतुक शाखा

Web Title: Color of zebra crossing in Thane changed; It was first conducted on an experimental basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.