भरगच्च कार्यक्रमांनी रंगला सखी आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:01 AM2020-02-29T00:01:22+5:302020-02-29T00:01:25+5:30

ठाणे : विविध स्पर्धा, कार्यक्रम, फॅशन शो, संगीत मैफल, नृत्याविष्कार आणि सेलिब्रेटिंची उपस्थिती अशा भरगच्च कार्यक्रमांनी सखीमंच आयोजित ‘आनंदोत्सव’ ...

Colorful celebration with great events | भरगच्च कार्यक्रमांनी रंगला सखी आनंदोत्सव

भरगच्च कार्यक्रमांनी रंगला सखी आनंदोत्सव

Next

ठाणे : विविध स्पर्धा, कार्यक्रम, फॅशन शो, संगीत मैफल, नृत्याविष्कार आणि सेलिब्रेटिंची उपस्थिती अशा भरगच्च कार्यक्रमांनी सखीमंच आयोजित ‘आनंदोत्सव’ हा तीन दिवसांचा कार्यक्रम ठाण्यात उत्साहात रंगला. या आनंदोत्सवात सखींनी सहभागी होत आनंद लुटला. ज्योवीज स्किम क्लिनिक हे या आनंदोत्सवाचे गिफ्ट पार्टनर होते.

प्रेम करणं किंवा होणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. पण आजकालच्या मुलांना प्रेमात भाळणं जमतं मात्र स्वत:ला सांभाळण जमत नाही. आपण आपल्या मुलींना वेळोवेळी वागण्या-बोलण्या-फिरण्याबाबत सूचना देत राहतो. पण मुलांना कधी तशा सूचना करत नाही. आपण आपल्या मुलामुलींना काही गोष्टींत आणि वेळीच नकार द्यायला आणि नकार पचवायला शिकवलं पाहिजे.
- साधना जोशी, प्रसिद्ध निवेदिका

आज महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे. पण आजच्या महिलेच्या मनात सुरक्षित भावना नाही. महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. पण महिलांनी आज सेल्फ डिफेन्स शिकलं पाहिजे. अज्ञातस्थळी आणि रात्रीच्या वेळी कुठेही जाताना शक्यतो कोणी विश्वासातील व्यक्ती सोबत असावी. अज्ञात ठिकाणच्या प्रवासाला जाताना कुटुंबातील व्यक्तींना मोबाइलद्वारे आपले लाइव्ह लोकेशन शेअर करा. आपले कायदे खूप मजबूत आहेत. त्यामुळे आपल्यावर किंवा इतर कोणावरही अत्याचार झाला तर पोलिसांना त्याची माहिती द्या. काहीही लपवू नका. कारण अन्याय करणाऱ्याइतकाच तो सहन करणाराही गुन्हेगार असतो, त्यामुळे झालेल्या अन्यायाबद्दल बिनधास्तपणे कोणत्याही योग्य व्यक्तीशी संवाद साधा.
- नीता पाडवी, सहा.पोलीस आयुक्त

महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले हे जरी खरं असलं तरी महिलांनी घाबरून जाऊ नये. कारण कायदा नावाचा कृष्णसखा आपल्या पाठिशी आहे. आता महिलांनी पोळपाटलाटणी नव्हे तर लेखणी आणि तलवार हाती घेतली पाहिजे. महिलांनी महिलांसाठी एकत्र झाले पाहिजे. महिला जोपर्यंत मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडत नव्हत्या तोपर्यंत सारं काही आलबेल होतं. मात्र गेल्या काही वर्षात या घटनांचे प्रमाण वाढले आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र महिलांनीही याचा विचार करायला हवा. आपण कसे राहतो, कसे वागतो-बोलतो हे पडताळले पाहिजे. महिलांनी समाजात वावरताना आपल्या मर्यादांचे भान ठेवणे गरजेचे आहे.
- डॉ. अरूंधती भालेराव, संचालिका, प्रारंभ कला अकादमी, मोटीव्हेशनल स्पीकर

स्त्रीवर होणाºया अत्याचाराबद्दल बोलायचं ठरवलं तर कुठून सुरू करावे... द्रौपदीच्या वस्त्रहरणाने की अलीकडच्या हृदयद्रावर घटनांनी. मुलामुलींना वाढवणे हे कर्तव्य नसून एक कला आहे. स्त्रीजातीचा अपमान हा समाजमनात खोलवर रूजला आहे. जी आई मुलीचं लग्न हुंडा देऊन करते तीच त्या मुलीची गुन्हेगार आणि मुलाच्या आशेने चारचार मुली होऊ देणारे आईबापही स्त्री जातीचे गुन्हेगार आहेत. कपडे घालण्याचे स्वातंत्र्य असले तरी ड्रेसकोड पाळलाच पाहिजे. बीचवेअरसारखे कपडे घालून आपण रेल्वेस्टेशन जावं का आणि नऊवरार नेसून बीचवर जाईन का हे प्रश्न स्वत:ला विचारावे. स्वसंरक्षण प्रत्येक मुलीमुलीला शिकवलं पाहिजे.
- डॉ.स्वाती गाडगीळ.

Web Title: Colorful celebration with great events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.