बॉलीवूडच्या महानायकाच्या गाण्यांची रंगली मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:03+5:302021-05-10T04:40:03+5:30
ठाणे : बॉलीवूडच्या महानायकाच्या गाण्यांची सांगीतिक मैफल शनिवारच्या सायंकाळी रंगली. एक से बढकर एक गीतांचा खजाना गायकांनी रसिकांसमोर उलगडला. ...
ठाणे : बॉलीवूडच्या महानायकाच्या गाण्यांची सांगीतिक मैफल शनिवारच्या सायंकाळी रंगली. एक से बढकर एक गीतांचा खजाना गायकांनी रसिकांसमोर उलगडला. ब्रह्मांड कट्टा आयोजित ओंकार संगीत ॲकॅडमी व मेंटेनन्स फ्री सोसायटीतर्फे ‘मैं हूं डॉन’ हा सुरेल गीतांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
गायक रवींद्र देसाई यांनी गायलेल्या ‘मैं पल दो पल का शायर हूं’ या धीरगंभीर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर योगेश यांनी ‘छुकर मेरे मन को...’, ‘ओ साथी रे’, ‘कभी सोचता हूं’ ही गाणी सादर केली. देसाई आणि राजाध्यक्ष जोडीने नंतर दोस्ताना आणि शानमधील ‘यम्मा यम्मा’ यांसारख्या गाण्यांनी धमाल उडवली. देसाई यांनी ‘रोते हुए आते है सब’, ‘जॉन जानी जनार्दन’, ‘सारा जमाना’ या गाण्यांनी एका बाजूला धमाल उडवली तर योगेश राजाध्यक्ष यांनीही अगदी कसलेल्या गायकाप्रमाणे ‘खैके पान बनारस वाला’, ‘मैं हूं डॉन’ आणि शेवटी गोव्याच्या वाटेवरील ‘देखा ना हाय रे सोचा ना’ ही गाणी बहार आणली. कार्यक्रमाचे निवेदन अर्चना देसाई यांनी केले. तर जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.
----