कोरोना वॉर्डात काम करणारे लढवय्ये मामा-मावशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 03:40 PM2020-05-14T15:40:51+5:302020-05-14T15:41:48+5:30
कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील सर्वच जणांवर ताण आहे. तसा जास्तीचा ताण हा हॉस्पीटलमधील वॉड बॉय आणि मावशींवर देखील आला आहे. कमी स्टाफ असल्याने आहे त्या मावशी मामांच्या खांद्यावर या रुग्णांची प्रमुख जबाबदारी येऊ न ठेपली आहे.
ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांपासून पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच ढाल बनून लोकांचे संरक्षण करीत आहेत. अनेक सामाजिक संस्था आणि पक्षांनी या लढाईत उडी घेतली आहे. सगळ्यांचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे कोरोनाचा पराभव करणे. रु ग्णालयात काम करणारा आणखी एक वर्ग यामध्ये थेट कोरोनाशी दोन हात करतो आहे. हॉस्पीटलच्या भाषेत त्याला मामा, वॉर्ड बॉय अथवा मावशी म्हटले जाते.
सध्या या मावशी-मामांचा प्रचंड तुटवडा सगळ्याच हॉस्पिटलांना जाणवत आहे. त्यामुळे कोरोना वॉर्डात ५०- ५० रु ग्णांची सेवा करण्याची जबाबदारी दोघा दोघा मावशी-मामांना सांभाळावी लागत आहे. १२-१२ तास हे खरे वॉरीयर्स कोरोनाशी झुंज देत रु ग्णांची सेवा करत आहेत. कोरोना पॉझटिव्ह वॉर्डात या मावशी-मामांची कोरोनाशी लढाई सुरू असून अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरात ठाणे महानगर पालिकेने घोषित केलेल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या ५० रु ग्णांना सेवा देण्यासाठी अवघे चार जण उपलब्ध आहेत. या रु ग्णालयाचे तीन मजले कोरोना रु ग्णांसाठी तयार केले आहेत. त्यामध्ये सुरु वातीला ६ एप्रिल रोजी एक पॉझटिव्ह रु ग्ण उपचारासाठी दाखल झाला. त्यानंतर एकाच्या घडीला येथे ५० हुन अधिक कोरोना पॉझटिव्ह रु ग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या वॉर्डात जाणारे डॉक्टर, नर्स रु ग्णांमध्ये सुरक्षित अंतर ठेवूनच उपचार करण्याची काळजी घेत असतात. मात्र हे मावशी आणि मामा यांना थेट रु ग्णांच्या संपर्कात जाऊन त्यांची शुश्रूषा करावी लागते. रु ग्ण गंभीर असेल तर त्याला आधार देऊन शौचाला घेऊन जाणे, जेवण भरविणे, बेड सीट बदलणे, कपडे बदलणे अशी कामे करावी लागतात. लहान मुल असेल तर त्याला अंघोळ घालणे, जेवण भरवणे अशी कामे करावी लागतात. सध्या रु ग्णांची संख्या वाढत असतानाच या हॉस्पिटलमधील मावशी-मामांची संख्या मात्र कमी होऊ लागली आहे. रु ग्णांच्या थेट संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांच्यावरही हॉस्पिटलने उपचार सुरू केले आहेत. अशी परिस्थिती बहुतके हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे. मावशी आणि मामाच पॉझटिव्ह होत असल्याने कोरोना वॉर्डात रु ग्णांची सेवा करायची कशी? असे प्रश्न रु ग्णालय प्रशासनांना सतावू लागले आहेत. नवीन कर्मचारी मिळणे कठीण झाले आहे. अशाही परिस्थितीत जेवढे मामा व मावशी अद्याप कोरोना पॉझटिव्ह झाले नाहीत, ते एखाद्या वॉरीयर्ससारखे कर्तव्य बजावीत आहेत. दिवसरात्र हॉस्पिटलमध्येच राहून रु ग्णांना सेवा देत आहेत. त्यामुळे या वॉरीयर्सला देखील लोकांचा सलाम आहे.
मी सहा महिन्यापासू येथे मावशी म्हणून काम करते. ६ एप्रिलपासून मला हॉस्पिटलमध्येच राहायला सांगून कोरोना वॉर्डची जबाबदारी दिली. अंगावर पीपीटी किट घालून १२-१२ तास रु ग्णांची सेवा केली आहे. सहा वर्षीय पॉझटिव्ह मुलीला आंघोळ घालण्यापासून सगळी कामे केली आहेत. सुरु वातीला एक मामा आणि माङयासह तीन मावश्यांनी १६ ते १८ तास काम केले. आता मला कोरोना संसर्ग झाला असल्याने माझ्यावर उपचार सुरू आहेत, परंतु यातून बरी झाल्यावर पुन्हा त्यांच्या सेवेला जाईल.
- कोरोना वॉर्डात काम करणारी मावशी