पुढच्या वर्षी लवकर या...; ठाणे जिल्ह्यातील दीड दिवसांच्या सुमारे ४२ हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप,
By जितेंद्र कालेकर | Published: September 1, 2022 10:14 PM2022-09-01T22:14:53+5:302022-09-01T22:16:32+5:30
कोरोनामुळे लादलेल्या निबंर्धांमुळे गणेशोत्सव गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने साजरा झाला होता.यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच राज्य शासनाने सण उत्सावांवरील निर्बंध उठविल्याने गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
ठाणे: दोन वषार्नंतर प्रथमच मोठ्या उत्साहात ठाणे शहरासह जिल्हाभर गणरायाची प्राणप्रतिष्ठापना बुधवारी झाली. त्यापाठोपाठ दीड दिवसांच्या बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर... अशा घोषात गुरुवारी जिल्ह्यातील ४२ हजार बाप्पांना भाविकांनी निरोप दिला. यामध्ये २४ सार्वजनिक तर ४१ हजार ८९५ घरगुती गणपती बाप्पांचा समावेश होता.
कोरोनामुळे लादलेल्या निबंर्धांमुळे गणेशोत्सव गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने साजरा झाला होता.यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच राज्य शासनाने सण उत्सावांवरील निर्बंध उठविल्याने गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर गुरुवारी सायंकाळपासून ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत ठिकठिकाणी मिरवणूका काढल्या होत्या. दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर जिल्ह्यातील ४१ हजार ९१९ गणेश मुर्तींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले.
यंदाही ठाणे शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१, रायलादेवी तलाव नं.२, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वुडस् उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर(हिरानंदानी) या ठिकाणी कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. शहरात सुमारे दोन हजार २५० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेच्या वतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी (चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल (निसर्ग उद्यान), कळवा (ठाणे बाजू), बाळकूम घाट आणि दिवा घाट असे एकूण सात विसर्जन घाट तयार केले आहेत. याठिकाणीही भाविकांनी दिड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले.