फाऊंटन टोल नाका येथील रस्त्यांच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:06 PM2020-12-13T16:06:19+5:302020-12-13T16:08:06+5:30
अलिकडेच खासदार विचारे हे वर्सोवा पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी फाउंटन हॉटेल येथील अतिक्रमण दूर करून मीरा-भार्इंदर महापालिकेने तयार करुन दिलेल्या सेवा रस्त्याची दूरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या रस्त्याची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून दुरु स्ती तसेच देखभाल व्यवस्थितरित्या होत नसल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्यामुळेच या रस्त्याचे काम आठ ते दहा दिवसांमध्ये मार्गी लावावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मीरा-भार्इंदर महापालिकेने तयार करुन दिलेल्या सेवा रस्त्याच्या दुरु स्ती आणि देखभालीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तातडीने करावे, अशा सूचना ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी अलिकडेच केलेल्या पाहणी दौऱ्यामध्ये प्रशासनाला केल्या होत्या. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामाला सुरुवात केली. कामाची सुरुवात झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
अलिकडेच खासदार विचारे हे वर्सोवा पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी फाउंटन हॉटेल येथील अतिक्रमण दूर करून मीरा-भार्इंदर महापालिकेने तयार करुन दिलेल्या सेवा रस्त्याची दूरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या रस्त्याची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून दुरु स्ती तसेच देखभाल व्यवस्थितरित्या होत नसल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्यामुळेच या रस्त्याचे काम आठ ते दहा दिवसांमध्ये मार्गी लावावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या. हे काम आता सुरु झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी विचारे यांनी पुन्हा या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, मीरा भार्इंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, कार्यकारी अभियंता दीपक खांबित आदी अधिकारीही होते. या कामाला सुरुवात झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या पाहणी दौºयामध्ये टोल नाका ते फाउंटन हॉटेलपर्यंतच्या पाचशे मीटरच्या रस्त्याची तीन अधिक तीन मार्गिका वाढविण्याचे काम तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामालाही सुरुवात केल्याची माहिती अधिकाºयांनी त्यांना दिली. मीरा भार्इंदर महापालिकेने तयार केलेल्या सेवा रस्त्याच्या खाली तीन वाहिन्या असल्यामुळे रस्ता उंच झाला आहे. या रस्त्याची पातळी योग्य तºहेने करुन त्यावर डांबरीकरण तातडीने करण्याच्या सूचनाही अधिकाºयांना विचारे यांनी केल्या. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाºया नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.