महापौरांसह आयुक्तांनी केली पडझडीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:32+5:302021-06-11T04:27:32+5:30
ठाणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई, पाणी साचणाऱ्या सखल ...
ठाणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई, पाणी साचणाऱ्या सखल भागांची आणि पडझड झालेल्या ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिवृष्टीमुळे शहरातील पाणी साचणा-या ठिकाणी पंप लावणे, रस्त्यावर वाहून आलेला कचरा तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तत्काळ उचलण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले.
यात चिखलवाडीनंतर त्यांनी महर्षी वाल्मीकी मार्ग, मायानगर कोपरी, पनामा सुपरमॅक्स कंपनी, आईमाता मंदिर चौक, महात्मा फुलेनगर तसेच ज्ञानेश्वरनगर येथील नाल्यांची पाहणी केली. पनामा येथील नाल्याच्या ठिकाणी महापौर म्हस्के यांनी नाला ीरुंदीकरण करण्याची सूचना केली. चिखलवाडी येथे मुसळधार पावसात नेहमीच पाणी साचते, त्या ठिकाणी पंप लावण्यात आले असून इतर अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून येथील समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.