आयुक्तांनी प्रभारी मुख्य वैद्यकिय अधिकारी नेमल्याने अखेर जन्म, मृत्यु दाखले देण्यास पुन्हा सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 07:30 PM2017-12-20T19:30:05+5:302017-12-20T19:30:22+5:30
केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणाली द्वारे जन्म व मृत्यु दाखले दिले जात असल्याने त्यासाठी पालिकेच्या मुख्य वैद्यकिय अधिकारयाने लॉग ईन करुन त्याची डिजीटल स्वाक्षरी द्यावी लागले. त्या नंतर दाखला मिळतो.
मीरारोड - विदेशी दारुच्या बाटल्यांची लाच घेताना मीरा भार्इंदर महापालिकेचा वैद्यकिय अधिकारयास अटक झाल्या नंतर न्दुसरया अधिकारयास पदभार न दिल्याने जन्म व मृत्यु दाखले देण्याचे ठप्प झाल्याचे वृत्त लोकमतने देताच खडबडुन जागे झालेल्या पालिकेने डॉ. प्रमोद पडवळ यांची प्रभारी मुख्य वैद्यकिय अधिकारी म्हणुन नियुक्ती केली आहे. या मुळे दाखले देण्यास सुरवात होऊन नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणाली द्वारे जन्म व मृत्यु दाखले दिले जात असल्याने त्यासाठी पालिकेच्या मुख्य वैद्यकिय अधिकारयाने लॉग ईन करुन त्याची डिजीटल स्वाक्षरी द्यावी लागले. त्या नंतर दाखला मिळतो.
पण वैद्यकिय अधिकारी पदी पालिकेचे नियुक्ती पत्र देण्यासाठी विदेशी दारुच्या बाटल्या लाच म्हणुन घेतल्याने शनिवारी रंगेहाथ पकडले गेलेले डॉ. प्रकाश जाधव यांच्या ऐवजी दुसरा प्रभारी अधिकारीच पालिकेने नेमला नाही. त्यामुळे जन्म व मृत्यु दाखला नोंदणी प्रमाणपत्र मंजुर करण्यासाठी युजर आयडी तसेच त्याची डिजीटल स्वाक्षरी वापरता येत नसल्याने दाखले देण्याचे काम ठप्प झाले.
लोकमत हॅलो ठाणेच्या मंगळवार १९ डिसेंबर रोजीच्या अंकातच या बाबतचे वृत्त आल्या नंतर पालिका प्रशासन खडबडुन जागे झाले. मंगळवारीच डॉ. नंदकिशोर लहाने यांना पदभार देण्याचे चालले होते. पण उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी आयुक्तांशी चर्चा करुन डॉ. प्रमोद पडवळ यांना पदभार देण्या बद्दल चर्चा करुन तसा प्रस्ताव मंजुरीसाठी दिला.
आयुक्तांनी त्याला मंजुरी दिल्याने आज बुधवारी सकाळीच डॉ. पडवळ यांनी आपल्या नावे युजर आयडी व डिजीटल सही साठी जनगणना संचानलयाचे मुख्यालय तसेच पुणे येथील उपमहानिबंधक कार्यालय यांच्या कडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला. व तो लगेच मंजुर देखील झाला. त्या मुळे जन्म - मृत्यु दाखले देण्याची ठप्प झालेली प्रक्रिया पुन्हा सुरु होऊन नागरीकांना दिलासा मिळालाय.