मीरा भाईंदरमधील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरु करण्याचे आयुक्तांचे आमदारांना आश्वासन

By धीरज परब | Published: September 12, 2023 07:41 PM2023-09-12T19:41:23+5:302023-09-12T19:41:36+5:30

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील सुमारे १८०० कोटी खर्चून काँक्रीट रस्ते बांधण्याची कामे पावसाळ्या नंतर सुरु केली जातील . ...

Commissioner assures MLAs to start concrete road works in Mira Bhayander after monsoon | मीरा भाईंदरमधील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरु करण्याचे आयुक्तांचे आमदारांना आश्वासन

मीरा भाईंदरमधील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरु करण्याचे आयुक्तांचे आमदारांना आश्वासन

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील सुमारे १८०० कोटी खर्चून काँक्रीट रस्ते बांधण्याची कामे पावसाळ्या नंतर सुरु केली जातील . सूर्या योजने नुसार २४ तास पाणी साठी शहर अंतर्गत पाणी वितरण योजनेचे काम सुद्धा सुरु केले जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे . 

राज्य शासना कडे केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने शहरातील विविध विकास कामांना मंजुरी आणि निधी शासनाने दिला आहे . शासनाने निधी दिलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तां कडे मंगळवारी बैठक झाली . यावेळी आ. सरनाईक , आयुक्त काटकर, शहर अभियंता दीपक खांबित, मुख्यलेखा परीक्षक सुधीर नाकाडी,  शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर , माजी विरोधी पक्षनेते धनेश पाटील , माजी नगरसेवक परशुराम म्हात्रे , विक्रमप्रताप सिंह , पूजा आमगावकर , सचिन मांजरेकर , संकेत गुरव, निखिल तावडे आदी उपस्थित होते .  

यावेळी आ. सरनाईक यांनी ३० हुन अधिक मुद्यांवर , विकास कामांवर आयुक्तांशी चर्चा केली व आढावा घेतला. मराठा भवन इमारत बांधकाम वेगाने करणे , नवीन महापालिका मुख्यालय इमारतीच्या कामाची सुरुवात करणे , मीरारोड येथील रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरु करणे आदी कामांचा समावेश होता . महापालिका मुख्यालयासाठी आवश्यक परवानग्या व प्रक्रिया पूर्ण करून काम सुरु करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. 

बीएसयुपी प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरु आहे.  एमएमआरडीएकडून ४० कोटीचे कर्ज मंजूर झाले असून उर्वरित ११० कोटी मिळण्यासाठी प्रयत्न करू.  प्रतीक्षेतील लाभार्थ्यांना घरे मिळण्यासाठी पीपीपी तत्वावर ठाणे महापालिकेच्या धर्तीवर बीएसयुपी योजना राबवा.  महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा पुढील वर्षांपासून सुरु करावी. स्विमिंग पूल , फुटबॉल टर्फ , लता मंगेशकर संगीत गुरुकुल कामांसाठी शासना कडून विशेष निधी मिळाला असल्याने ही कामे लवकर सुरु करा असे आ . सरनाईक म्हणाले . 

आगामी १ वर्षात लोकसभा , विधानसभा , महापालिका यांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेत विकासकामे पूर्ण करावी . नवीन विकास आराखडा बनवत असताना त्यात बस पार्किंग , दफनभूमी , मार्केट , घनकचरा प्रकल्प , इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन , सर्वधर्मीय स्मशान भूमी अशी विविध आरक्षणे ठेवण्यात यावीत अशी मागणी या पूर्वी देखील केल्याने त्याची अंलबजावणी करण्याचे आ . सरनाईक यांनी सांगितले असता आयुक्तांनी मान्य केले . 

Web Title: Commissioner assures MLAs to start concrete road works in Mira Bhayander after monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.