आयुक्तांनी केडीएमसीची ओळख बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:51+5:302021-07-07T04:49:51+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका यापूर्वी भ्रष्ट अधिकारी, भ्रष्टाचार, खड्डे, ट्रॅफिक जाम यासाठी ओळखली जात होती. मात्र, आयुक्त डॉ. विजय ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका यापूर्वी भ्रष्ट अधिकारी, भ्रष्टाचार, खड्डे, ट्रॅफिक जाम यासाठी ओळखली जात होती. मात्र, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे महापालिकेची वेगळी ओळख तयार झाली. त्यामुळेच महापालिकेस देशपातळीवर कोरोना इन्व्होवेशन अवॉर्ड मिळाला. महापालिका नंबर वन ठरली, असे गौरवोद्गार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी काढले.
काँग्रेसतर्फे सोमवारी सूर्यवंशी यांचा शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती धातूचा पुतळाही भेट देण्यात आला. यावेळी पदाधिकारी ब्रीज दत्त, जितेंद्र भोईर, कांचन कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून आयुक्तांचा गौरव करण्यात आला होता. तसेच विविध संस्थांकडून त्यांना गौरविण्यात आले आहे.
देशपातळीवरील पुरस्काराची हॅट्ट्रिक
आयुक्त सूर्यवंशी हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असताना कोल्हापूर जिल्हा परिषद देश पातळीवर उत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून गौरविली गेली. त्यानंतर गोंदिया जिल्हा अधिकारी असताना मनरेगा योजनेच्या कामगिरीबद्दल देशपातळीवर गौरविले गेले होते. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेस कोरोना इन्व्होशन अवॉर्ड मिळाल्याने देशात नंबरवर ठरली.
------------------------