आयुक्तांना प्रशासकीय सेवेचा विसर; आनंद परांजपे यांचा आरोप

By अजित मांडके | Published: August 2, 2022 03:05 PM2022-08-02T15:05:25+5:302022-08-02T15:07:18+5:30

ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना आपल्या प्रशासकीय कर्तव्यांची आठवणच राहिलेली नाही. महासभेची मुदत ९ मार्चला संपलेली आहे.

commissioner forgets administrative service allegation ncp anand paranjape | आयुक्तांना प्रशासकीय सेवेचा विसर; आनंद परांजपे यांचा आरोप

आयुक्तांना प्रशासकीय सेवेचा विसर; आनंद परांजपे यांचा आरोप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे: ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना आपल्या प्रशासकीय कर्तव्यांची आठवणच राहिलेली नाही. महासभेची मुदत ९ मार्चला संपलेली आहे. त्यामुळे ठामपातील १३१ नगरसेवक हे सामान्य ठाणेकर झालेले आहेत. कोणी महापौर नाही, कोणी उपमहापौर नाही, कोणी स्थायी समिती सभापती नाही किंवा कोणीही सभागृह नेता नाही; ही पदे आता अस्तित्वात नाहीत. त्यामुळे डॉ. विपीन शर्मा हे स्वतः पालिकेचे प्रशासक आहेत. त्यांनी जरूर ठाणे शहराचे दौरे करावेत; विकासकामांची माहिती प्रसारमाध्यांमातून ठाणेकरांना द्यावी. पण, ज्या महासभेचे अस्तित्व संपलेले आहे; अशा महापौरांना सोबत घेऊन आयुक्त सातत्याने कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर समन्वयक तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. 

त्याबाबतची लेखी तक्रार मुख्य सचिवांकडे आपण करणार असल्याचे सांगत  माझी आयुक्तांना विनंती आहे की कायदा तोडणारे आयुक्त असे चित्र ठाणेकरांसमोर उभे करू नका असे आवाहनही त्यांनी केले. 

माजी महापौर नरेश म्हस्के हे ठाणे महानगर पालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींसोबत पत्रकारांना संबोधित करीत होते. याबाबत परांजपे यांना विचारले असता, त्यांनी हि टीका केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदेगटात प्रवेश करणार आहेत, असे विधान म्हस्के यांनी केले होते, याबाबत विचारले असता, म्हस्के यांचा स्वतःचा इतिहास तपासून घ्या. आपणाला त्यावर अधिक बोलायचे नाही. ज्यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरे , शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अन् शिवसेनेचा वेगळा शिंदे गटाची ज्यांनी स्थापना केली. त्यांचा पुढाकार आपण ठाणेकरांनी पाहिलेला आहे. त्यावर न बोललेले बरे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली खंबीर आणि भक्कम आहे. त्याची प्रचिती नुकतीच आली आहे, राज्यपाल  कोश्यारींविरोधात केलेल्या आंदोलनानंतर कोश्यारी यांना माफी मागावी लागली आहे. त्यामुळे म्हस्के यांनी स्वतः बघावे की आपण कोणत्या गटात, कोणत्या तटात की कोणत्या गटारात आहोत, हे तपासावे. राष्ट्रवादी येथे सक्षम आहे, असा टोला परांजपे यांनी लगावला.
 

Web Title: commissioner forgets administrative service allegation ncp anand paranjape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.