आयुक्तांनी केली नालेसफाईसह रंगरंगोटीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:47+5:302021-06-04T04:30:47+5:30

ठाणे : पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आग्रही असलेले महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गुरुवारी शहरातील नालेसफाई, ...

The commissioner inspected the colors with non-cleaning | आयुक्तांनी केली नालेसफाईसह रंगरंगोटीची पाहणी

आयुक्तांनी केली नालेसफाईसह रंगरंगोटीची पाहणी

Next

ठाणे : पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आग्रही असलेले महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गुरुवारी शहरातील नालेसफाई, रंगरंगोटी, फुटपाथ आणि खड्डे दुरुस्ती कामांची पाहणी करून पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही, तसेच कुठलीही दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

दुपारी १२ वाजता महापालिका आयुक्त शर्मा यांनी कॅडबरी जंक्शन येथील खड्डे दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून कापूरबावडीनाका नाल्यापासून नालेसफाई कामाच्या पाहणीस सुरुवात केली. यावेळी उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, डॉ. बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते. कापूरबावडी, आनंदनगर नाल्यांच्या सफाईची पाहणी करून अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या तसेच सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना दिल्या. रस्ते दुरुस्ती पाहणीत कॅडबरी जंक्शन सेवा आणि लुईसवाडी येथील सेवा रस्त्यांचे पूर्णतः डांबरीकरण करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास दिला. शहराच्या सौंदर्यात विशेष भर पडावी, यासाठी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भिंती तसेच रस्ते दुभाजक आकर्षक रंग तसेच भिंतीचित्रांनी रंगवण्याचे काम सुरू केले. व्हिव्हियांना मॉल, बारा बंगला, मुलुंड चेक नाका, आनंदनगर येथील रंगरंगोटी कामाची पाहणी केली.

Web Title: The commissioner inspected the colors with non-cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.