उल्हासनगरातील नाले सफाईची आयुक्तांकडून पाहणी, आमदार कार्यालयात आयुक्तांची चर्चा
By सदानंद नाईक | Published: May 27, 2023 07:35 PM2023-05-27T19:35:50+5:302023-05-27T19:37:21+5:30
आमदार जनसंपर्क कार्यालयात आयुक्तांसह अधिकाऱ्यांसोबत नालेसफाई बाबत चर्चा केली.
सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी अधिकाऱ्यांसह शनिवारी नाले सफाईची पाहणी केली. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी हजेरी लावली असून आमदार जनसंपर्क कार्यालयात आयुक्तांसह अधिकाऱ्यांसोबत नालेसफाई बाबत चर्चा केली.
उल्हासनगर अंतर्गत लहान-मोठ्या नाल्याची सफाई गेल्या आठवड्या पासून सुरू झाली आहे. नाले सफाई व्यवस्थित होते की नाही. याबाबतची पाहणी आयुक्त अजीज शेख यांनी अधिकाऱ्यांसह शनिवारी केली. नाले सफाईची पाहणी आयुक्ताकडून सुरू असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांना मिळाल्यावर, त्यांनी नाले सफाई पाहणीत हजेरी लावली. तसेच आयुक्त अजीज शेख यांच्यासह सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी व अन्य अधिकाऱ्यां सोबत चर्चा करून नाले सफाईचा आढावा घेतला. एकीकडे नाले सफाई सुरू असल्याचे दाखवीत असलेतरी, दुसरीकडे बहुतांश नाले प्लास्टिक पिशव्याच्या कचऱ्याची तुडुंब भरल्याचा आरोप नागरिकांसह विविध राजकीय पक्षनेत्याकडून होत आहे.
महापालिका आयुक्त अजीज शेख हे अधिकाऱ्यांच्या टीमसह आमदार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयात नाले सफाई बाबत चर्चा कार्यालया पासून जवळच महापालिका मुख्यालय आहे. त्याठिकाणी आमदार आयलानी यांच्या सोबत आयुक्तांनी चर्चा करायला हवी. असे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत संपर्क केला असता, झाला नाही. आमदार कुमार आयलानी हे अनेकदा शहरातील विविध समस्या बाबत विविध विभाग अधिकाऱ्यांच्या बैठका व चर्चा जनसंपर्क आमदार कार्यालयात घेत असल्याने, अधिकारी वर्ग खाजगीत नाराजी व्यक्त करीत असल्याचे चित्र आहे.