उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी आयएएस पदी निवड, सेवानिवृतीपूर्वी गुडन्यूज

By सदानंद नाईक | Published: May 24, 2024 09:30 PM2024-05-24T21:30:50+5:302024-05-24T21:31:02+5:30

३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते.

Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation Aziz Shaikh promoted as IAS, good news before retirement | उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी आयएएस पदी निवड, सेवानिवृतीपूर्वी गुडन्यूज

उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी आयएएस पदी निवड, सेवानिवृतीपूर्वी गुडन्यूज

उल्हासनगर: शहरात विविध उपक्रम राबविणारे महापालिका आयुक्त अजीज शेख येणाऱ्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांची आयएएस पदी पदोन्नती झाल्याची गुडन्यूज मिळाली आहे. त्यांना दोन वर्षे शासन सेवा मिळणार असून त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होणार आहे. 

उल्हासनगर महापाकिकेच्या आयुक्तपदी अजीज शेख यांची नियुक्ती झाल्यावर, त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वय साधून महापालिकेतील कामाची पद्धत बदलून टाकण्यात आली. त्यांच्या दोन वर्षांच्या कालावधीत सिंधूभवन, महापालिका रुग्णालय, उल्हास घाट उभा राहिला आहे. तसेच एमएमआरडीए अंतर्गत १५० व ९९ कोटीच्या निधीतून रस्ते व इतर विकास कामे, ४२६ कोटींची भुयारी गटार योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली असून कचरा उचलण्यासाठी अद्यावत गाड्या, अग्निशमन विभागात गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच अधिकारी व कर्मचारी आदींची संख्या कमी असताना महापालिका कारभार यशस्वीपणे हाकत आहेत. आयएएस निवड झाल्यावर त्यांना २ वर्ष शासन सेवा मिळणार आहे. आयएएस पदी निवड झाल्यानंतर अजीज शेख यांची इतर ठिकाणी बढती मिळते की? महापालिकेत आपला कार्यकाल पूर्ण करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Web Title: Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation Aziz Shaikh promoted as IAS, good news before retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.