Bhiwandi: भिवंडी महापालिकेचा ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजारांचा अर्थसंकल्प आयुक्तांनी केला सादर 

By नितीन पंडित | Published: March 20, 2023 06:19 PM2023-03-20T18:19:32+5:302023-03-20T18:20:14+5:30

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी महानगरपालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ११ कोटी ६२ लाख शिल्लक दर्शविणारा ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपयांचा अर्थसंकल्प विभाग प्रमुखांच्या प्रशासकीय समिती समोर मनपा आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी सोमवारी सादर केला.

Commissioner presented the budget of Bhiwandi Municipal Corporation of 897 crores 69 lakhs 63 thousand | Bhiwandi: भिवंडी महापालिकेचा ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजारांचा अर्थसंकल्प आयुक्तांनी केला सादर 

Bhiwandi: भिवंडी महापालिकेचा ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजारांचा अर्थसंकल्प आयुक्तांनी केला सादर 

googlenewsNext

- नितीन पंडित
 भिवंडी - भिवंडी महानगरपालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ११ कोटी ६२ लाख शिल्लक दर्शविणारा ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपयांचा अर्थसंकल्प विभाग प्रमुखांच्या प्रशासकीय समिती समोर मनपा आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी सोमवारी सादर केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे,मुख्य लेख व वित्त अधिकारी किरण तायडे,उपायुक्त मुख्यालय दीपक पुजारी,उपायुक्त दीपक झिंजाड,उपायुक्त प्रणाली घोंगे, सर्व विभाग प्रमुख पालिका अधिकारी उपस्थित होते.

भिवंडी महापालिकेचा सन २०२२-२३ चे सुधारीत ८८७ कोटी ६४ लाख २० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.तर २०२३-२४ मध्ये महानगरपालिकेची अंदाजित प्रारंभिक शिल्लक १७ कोटी १६ लाख ८५ हजार अपेक्षित धरून एकुण उत्पन्न प्रारंभिक शिल्लकेसह ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजार अपेक्षित धरून ११ कोटी ६२ लाख शिल्लकेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात विशेष करून मलनिसारण प्रकल्पासाठी आवश्यक एसटीपी प्लँट कार्यान्वीत करणे,शहरात स्मशानभुमी मध्ये गॅस दाहीनीची सुविधा उपलब्ध करून देणे,पालिकेचा ३० खाटांचा बीजीपी दवाखाना कार्यान्वीत करणे,शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाची निगा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे,सिमेंट कॉक्रिट रोड तयार करणे,अटल आनंद घन वन प्रकल्प,कै.परशुराम धोंडु टावरे स्टेडीअम क्रिडा संकुलन सुशोभिकरण करणे,मनपा शाळा इमारती बळकटीकरण करणे व बेंचेस पुरविणे,स्व. मिनाताई ठाकरे नाट्यगृहाचे नुतनीकरण करणे,सौर ऊर्जा प्रकल्प,नगरसेवक निधीसाठी ९कोटी ७० लाख ८८ हजारांची तरतूद या अर्थसंकल्पात करणेत आली आहे.तसेच महिला व बाल कल्याण,दुर्बल घटक,दिव्यांग कल्याण साठी ३२कोटी ८८ लाख रुपयांचा निधीची तरतूद केली असून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लवकरच पाण्याच्या टाक्या वापरात आणण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याची माहिती मनपा आयुक्त म्हसाळ यांनी दिली आहे.

तर सन २०२२-२३ मध्ये मनपा शाळांची दुरुस्ती,अग्निशमन विभागाकरीता अत्याधुनिक वाहने तसेच अत्याधुनिक गणवेश व साधन सामुग्री खरेदी करण्यात आली असून,नाना नानी पार्क येथे बॅडमिंटन कोर्ट बांधकाम,रस्त्यांचे काँक्रेटीकरण,बी.जी.पी. रुग्णालय इमारतीचे बांधकाम व चार नागरी आरोग्य केंद्र बांधकाम,दिव्यांग लाभार्थीना आर्थिक सहाय,दिव्यांग विद्यार्थी सहाय्य,कोरोना काळात अनाथ झालेल्या २३ बालकांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे अर्थसहाय्य,४८ लाभार्थीना बेकरी पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण,६० लाभार्थीना अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण,५१ लाभार्थीना संस्कार भारती रांगोळी काढणेचे प्रशिक्षण,५१ लाभार्थीना पेपर बॅग बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती आयुक्त म्हसाळ यांनी दिली आहे.

Web Title: Commissioner presented the budget of Bhiwandi Municipal Corporation of 897 crores 69 lakhs 63 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.