ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ - आयुक्त डॉ. जाधव

By सुरेश लोखंडे | Published: September 20, 2022 06:47 PM2022-09-20T18:47:58+5:302022-09-20T18:48:33+5:30

ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे आयुक्त डॉ. जाधव यांनी म्हटले. 

Commissioner said that transparency and efficiency in administration has increased due to online services  | ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ - आयुक्त डॉ. जाधव

ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ - आयुक्त डॉ. जाधव

Next

ठाणे : माहिती तंत्रज्ञानामुळे प्रशासनात आमूलाग्र बदल झाला. ऑनलाईन सेवांमुळे पारदर्शकता, गतिमानता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली आहे. नागरिकांना सेवा देण्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. त्यातही ठाणे जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाद्वारे नागरिकांना सेवा देण्यात पुढे आहे. लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवा देण्यातही ठाणे जिल्हा प्रथम असेल अशी आशा आहे, असे राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कोकण महसूल विभागाचे प्रभारी आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी येथील जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.

ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता
नियोजन भवनातील सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीची वार्षिक समीक्षा आढावा बैठक मंगळवारी पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून आयुक्त बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यास मदत होत आहे. या सेवा देताना मात्र पदनिर्देशित अधिकाऱ्यानी संवेदनशील रहावे. यानुसार जिल्हा प्रशासनाने या पुढील काळातही जास्तीत जास्त सेवा अधिसूचित करून त्या ऑनलाईन देण्यात याव्यात, अशी अपेक्षाही यावेळी आयुक्तांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयोगाचे सहसचिव माणिक दिवे, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी डॉ. रुपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, बाळासाहेब वाकचौरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, भूमी अभिलेखाचे जिल्हा अधिक्षक बाबासाहेब रेडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

सध्या सेवा पंधरवडा सुरू आहे. येत्या २ ऑक्टोंबरपर्यंत अधिकाधिक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा. ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी भागात सेवा पोचविण्यासाठी महिला बचत गटांना सेवा केंद्र सुरू करण्यास द्यावे, अशी सूचना यावेळी आयुक्तानी केल्या. ते पुढे म्हणाले की लोकांना अधिसूचित सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची तरतूद अधिनियमात आहे. त्याच बरोबर चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध कारवाईची तरतूद ही यात आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी सेवेच्या हक्काची अंमलबजावणी कार्यतत्परतेने करावी. नागरिकांना सेवा देताना ते त्या सेवेसाठी पात्र कसे होतील हे पहावे. जे अपात्र ठरणार आहेत, त्यांचे समुपदेशन करावे, असेही आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ऑनलाईन सेवांचा फायदा होणार 
संकेतस्थळ व पवरून सेवांचा लाभ घ्या, लोकसेवा हक्क अधिनियमामधील सेवा आता सेवा केंद्रावर न जाताही घेता येतात. आपले सरकार या संकेतस्थळावरून तसेच आरटीएस महाराष्ट्र या पद्वारेही आता सेवा घेता येत आहेत. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ठाणे जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ऑनलाईन सेवांचा सर्वाधिक फायदा होणार आहे. जिल्हा प्रशासनाने १९ सेवा अधिसूचित केल्या आहेत. जिल्ह्यातील ८१७ आपले सरकार सेवा केंद्रावरून या सेवा दिल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी आयुक्तांच्या लक्षात लक्षात आणून दिले.

 

Web Title: Commissioner said that transparency and efficiency in administration has increased due to online services 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.