स्वच्छतेसाठी आयुक्त रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:57 PM2018-02-23T23:57:33+5:302018-02-23T23:57:33+5:30
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयुक्तांनी शहाड परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. अस्वच्छ प्रभागाला जबाबदार धरून स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाई केली
उल्हासनगर : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयुक्तांनी शहाड परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. अस्वच्छ प्रभागाला जबाबदार धरून स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच प्लास्टिक पिशव्या वापरणारे दुकानदार, कचरा रस्त्यावर टाकण्याºया नागरिकांकडून ६० हजाराचा दंड वसूल केला.
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त बिर्लागेट ते बस स्टॉप परिसरात स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबवले. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी हातात झाडू घेऊन समाजसेवक भरत खरे, महापालिका कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, नागरिक यांच्या समवेत साफसफाई केली. त्यानंतर प्रभागातील स्वच्छतेचा आढावा घेतला असता काही प्रभाग अस्वच्छ दिसला. त्यांनी त्वरित २ स्वच्छता निरीक्षक, २ मुकादम व २२ सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांना दिले.
स्वच्छता अभियानातंर्गत निंबाळकर यांनी रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघडयावर लघुशंका व प्रातर्विधी करणे, प्लास्टिक पिशव्या वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. तसेच जो प्रभाग अस्वच्छ दिसेल तेथील संबंधित स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केली. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवताना काही प्रभागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांना काही अस्वच्छ प्रभाग दिसल्याने त्या प्रभाग संबंधित तब्बल २६ पालिका कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई केली. असाच दंड नागरिकांकडून वसूल केला जात असल्याचे आयुक्त म्हणाले.