उद्याने, मैदानांसह स्मशानभूमींच्या दुरवस्थेवरून आयुक्तांनी घेतली झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:16+5:302021-03-17T04:41:16+5:30

मीरारोड : मीरा-भाईंदरमधील उद्याने, मैदानांसह स्मशानभूमींची पाहणी करून आयुक्त दिलीप ढोले यांनी त्यांची देखभाल व स्वच्छता राखणे, झाडांची निगा ...

The commissioner took care of the trees due to the poor condition of the parks, grounds and cemeteries | उद्याने, मैदानांसह स्मशानभूमींच्या दुरवस्थेवरून आयुक्तांनी घेतली झाडाझडती

उद्याने, मैदानांसह स्मशानभूमींच्या दुरवस्थेवरून आयुक्तांनी घेतली झाडाझडती

Next

मीरारोड : मीरा-भाईंदरमधील उद्याने, मैदानांसह स्मशानभूमींची पाहणी करून आयुक्त दिलीप ढोले यांनी त्यांची देखभाल व स्वच्छता राखणे, झाडांची निगा राखणे व सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले .

आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी शहरातील आरक्षणे, रस्त्यांची कामे, आरक्षणातील विकासकामे आदींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांनी भाईंदर पश्चिमेतील राणी लक्ष्मीबाई उद्यान, महाराणा प्रताप उद्यान, सालासर हनुमान उद्यान, मुर्धा बाल उद्यान, मुर्धा स्मशानभूमी, मुर्धां दफनभूमी, मुर्धां राममंदिर तलाव उद्यान, मुर्धां गावदेवी उद्यानांची पाहणी करून अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

यावेळी आयुक्तांसह उपमुख्य उद्यान अधीक्षक व नागेश विरकर, योगेश म्हात्रे, भरत सोनारे उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी अनावश्यक डेब्रिज काढून उद्यान स्वच्छ व सुंदर दिसेल, अशी कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले. शहरातील हरितक्षेत्र वाढविण्यासह आहे त्या झाडांची प्रभावीपणे देखभाल व संरक्षण करून नागरिकांना चांगले प्रदूषणमुक्त पर्यावरण मिळावे यासाठी हरित क्षेत्रासाठी वनीकरणावर भर द्या. उद्यानात लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी गवत किंवा वाळू असायला हवी असताना तेथे काँक्रिटीकरण केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. यामुळे खेळताना पडून मुलांना इजा होण्याची भीती आयुक्तांनी व्यक्त केली.

Web Title: The commissioner took care of the trees due to the poor condition of the parks, grounds and cemeteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.