उल्हासनगरातील प्रभात गार्डनच्या चौकशीसाठी समिती, ठेकेदाराचे दणाणले धाबे, आयुक्ताची कारवाई
By सदानंद नाईक | Updated: February 21, 2025 20:44 IST2025-02-21T20:42:19+5:302025-02-21T20:44:43+5:30
गेल्या अनेक वर्षापासून नेताजी गार्डनचे काम अर्धवट असल्याची माहिती उघड झाले असून ठेकेदाराचे धाबे दणाणले आहे.

उल्हासनगरातील प्रभात गार्डनच्या चौकशीसाठी समिती, ठेकेदाराचे दणाणले धाबे, आयुक्ताची कारवाई
उल्हासनगर : शहर पूर्वेतील नेताजी (प्रभात) गार्डनची पाहणी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी करून उद्यानाच्या कामाच्या चौकशीसाठी ऐक समिती नियुक्ती केली. गेल्या अनेक वर्षापासून नेताजी गार्डनचे काम अर्धवट असल्याची माहिती उघड झाले असून ठेकेदाराचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर पुर्व येथील नेताजी (प्रभात) उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. मात्र अध्यापही गार्डनचे काम अपुरे असल्याची माहिती आयुक्त मनिषा आव्हाळे यांनं मिळाली होती. त्यांनी गेल्या आठवड्यात गार्डनची पाहणी करून विकास कामाबाबत माहिती घेतली. अखेर आयुक्त आव्हाळे यांनी गार्डनच्या विकास कामाच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्ती केली. आयुक्तांच्या आदेशाने ठेकेदाराचे धाबे दणाणले असून सपना गार्डन, नाना-नाणी पार्क गार्डन, लाल साई उद्याना आदीच्या विकास कामाची चौकशी आयुक्तानी केल्यास, खरा प्रकार उघड झाला. मोजक्याच उद्यानावर कोट्यावधीचा खर्च करण्यात येत असून इतर उद्यानाची दुरावस्था होऊन त्यावर अतिक्रमण होत असल्याचे चित्र आहे.
शहरातील पाहणी केलेल्या नेताजी (प्रभात) गार्डनचची संरक्षण भिंत अनेक ठिकाणी पडली असून त्यावरील लोखंडी जाळ्या चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. संरक्षण भिंत तुटल्याने, नशेखोर विना अडथळा गार्डनचा उपयोग करीत असल्याने, उद्यान नशेखोरांचा अड्डा बनला आहे. उद्यानातील लोखंडी साहित्य गेले कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे. एकूणच महापालिका उद्याने सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला.