गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांवर समितीचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:19 AM2017-08-02T02:19:49+5:302017-08-02T02:19:49+5:30
येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांची मंडप उभारण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. परंतु,
ठाणे : येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांची मंडप उभारण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. परंतु,न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशानुसार अधिकचा मंडप उभारला गेला, रस्त्यावर खड्डे केले, मंडपाची उंची ३० फुटांपेक्षा जास्त झाली किंवा इतर काही नियम मोडण्याचा प्रयत्न करणाºया शहरातील लहान मोठ्या गणेशोत्सव मंडळांवर वॉच ठेवण्यासाठी, पालिका स्तरावर एक मुख्य समिती आणि प्रभाग समितीनिहाय १० समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
परंतु, या १० समित्यांकडून योग्य निर्णय येईलच अशी श्वावती नाही. त्यामुळे मुख्य समिती शहरातील सुमारे ५५० हून अधिक मंडपापर्यंत पोहण्यात यशस्वी होईल का? हा महत्त्वाचा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
उत्सवा दरम्यान रस्त्यावर उभारल्या जाणाºया मंडपासाठी दोन वर्षापूर्वी आदर्श आचारसंहिता म्हणजे सुधारीत धोरण ठाणे महापालिकेने तयार केले आहे. त्याला महासभेने मंजुरी दिली आहे. यानुसार एक तृतीआंश जागेत मंडप उभारणीला परवानगी देण्याचे निश्चित केले आहे. परंतु,असे असले तरीदेखील मागील वर्षी अनेक मंडळांनी या आचारसंहितेचे उल्लघन केले होते. त्यामुळे पालिकेने आणि पोलिसांनीदेखील शहरात सुमारे ४५० नोटीसा बजावून अनेक मंडळांना एक लाखांची नोटीस बजावली होत्या. परंतु, याला शिवसेना आणि राष्टÑवादीने विरोध केल्याने पालिकेने या नोटीसा मागे घेतल्या होत्या.